पुणे दि १८ :- पुणे शहरात, कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना पुणे शहर डेक्कन पोलिसांनी अटक केली. जंगली महाराज रस्त्यावरील एका वैद्यकीय चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेच्या नावाने आरोपींनी बनावट अहवाल दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट रिपोर्ट देणाऱ्यांचे रॅकेट समोर आल्यामुळे पुणे शहरात एकच खबवळ उडाली आहे.ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, मूळ रा. द्रावणकोळा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे (वय २१, सध्या रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, मूळ रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत जंगली महाराज रस्ता परिसरातील प्रयागेशाळेच्या व्यवस्थापकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जंगली महाराज रस्त्यावरील एका प्रयोगशाळेच्या नावाने कोरोना चाचणीचे बनावट अहवाल तयार करून हांडे आणि खराटे यांच्याकडून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलिधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब झरेकर यांच्या पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली.आरोपी पूर्वी एका लॅबमध्ये कामाला होता. ज्या नागरिकांना तत्काळ रिपोर्ट हवे आहेत. त्यांच्याकडून पैसे घेऊन बनावट रिपोर्ट मोबाईलवर पाठवत होते. या दोघांनी लॅबमध्ये काम केले असल्यामुळे स्वॅब घेतल्याचे दाखवून खोटे रिपोर्ट देखील दिले असण्याची शक्यता आहे. तसेच, काही जणांना तत्काळ कामांसाठी निगेटिव्ह रिपोर्ट हवे होते. त्यांना तसे बनावट रिपोर्ट दोघांनी दिले आहेत. या प्रकरणी दोघांकडे अधिक तपास सुरू आहे,गुन्हयात अटक करण्यात आली आहे . सदर आरोपी यांनी प्राथमिक चौकशीमध्ये अनेक लोकांचे Covid RT – PCR चाचणी बनावट रिपोर्ट बनवुन दिल्याची माहिती दिली आहे.सदर आरोपी सध्या संपुर्ण जगात पसरलेल्या कोरोना ( कोविड -१९ ) संसर्गजन्य विषाणू आजाराचे चाचणी रिपोर्ट बनावट करीत असल्याचे उघड झाल्याने व त्यास प्रतिबंध झाल्याने कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव पसरण्याचा मोठा अनर्थ टळला आहे . सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग संजय शिंदे , पोलीस उपआयुक्त , गुन्हे ( अति.कार्यभार परिमंडळ -०१ )श्रीनिवास घाडगे , मा.सहा.पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग ,मालोजीराव पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक. मुरलीधर करपे यांचे मार्गदर्शनाखी सहा . पोलीस निरीक्षक , बाबासाहेब झरेकर , पोलीस उपनिरीक्षक अभिजित कुदळे , पोहवा इनामदार , पोशि देवढे , पोशि शिंदे , पोशि पाटील , पोशि पानपाटील यांनी केली आहे . पुणे शहर पोलीसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अशा प्रकारे कोणत्याही अनोळखी इसमांवर विश्वास ठेवुन कोविड चाचणी न करता मान्यता प्राप्त लॅबमधुनच चाचणी करुन खात्री करुन रिपोर्ट घ्यावा व कोरोना ( कोविड -१९ ) संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने सर्वांनी योग्य दक्षता / काळजी घ्यावी .