श्रीगोंदा दि ११ :-श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांनो कुकडीच्या पाण्यासाठी चाललेले राजकारण थांबवा पत्र दिले,फोन केला यासारख्या चर्चा आता थांबवा लोकांच्या भावनेवर आपण राजकीय पोळी भाजत आहात.तालुक्यातील नेते याप्रश्नी राजकारण करून श्रेय घेण्यात पटाईत आहेत. नागवडे म्हणाल्या की, तालुक्यातील सर्व राजकीय नेत्याचे राजकारणात वेटेज असताना पाणी का मिळत नाही.याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.तसेच येणाऱ्या काळात श्रीगोंदा तालुक्याला पाण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे.प्रत्येक गोष्टीत राजकारण नको, कुकडीच्या पाणी प्रश्नाबाबत तालुक्यातील सर्व राजकिय नेत्यांनी एकत्र आले पाहिजे.कोणी बरोबर नाही आले तरी मी हे सर्व शेतकरी, महिला यांना सोबत घेऊन करणार आहे.जर यात कोणी राजकारण आणणार असेल तर त्याकडे सर्वसामान्य जनता पाहून घेईल.मला कोणाबद्दल राग,द्वेष नाही.सर्वांनी पाण्यासाठी एकत्र यावे किंवा कोणाला कमी पणा वाटत असेल तर त्यांनी नागवडेना बोलवावे.पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाल्या की,तालुक्यातील सर्व जनतेचे आदरणीय बापुवर खूप प्रेम होते आणि तोच वारसा मी अविरत पणे पुढे नेणार आहे.कोरोना महामारी सोबत सर्वांना तोंड द्यायचे आहे.आरोग्य विभागाने सांगितले आहे की, कोरोना हा फार भयंकर रोग आहे आणि कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत चालली आहे.त्यामुळे येत्या काही दिवसातच कोविड सेंटरसाठी शहरातील छत्रपती महाविद्यालयात 250 बेडची सुविधा असलेली जागा उपलब्ध करून देणार आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे