पुणे दि ०६:- : जगभर थैमान घालणाऱ्या करोना संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्यासाठी करोना योध्दे लढत आहे. त्यांच्या या समर्पनाचा सन्मान करण्यासाठी यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी कारोनायोध्यांसाठी गुढी उभारून त्यांना पुणेकरांनी अनोखी मानवंदना द्यावी असे आवाहन मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे. त्यासाठी पुणेकरांनी गुढी उभारताना कुटुंबातील मुलांना कोरोना योद्धाची वेषभूषा परिधान करायला सांगावी तसेच गुढीवर कोरोना संदर्भात एक आकर्षक संदेश लावावा अथवा करोना योध्यांच्या हातून गुढी उभारण्यात यावी. तसेच हे फोटो सोशल मिडीयावर पाठवावेत अथवा आमच्याकडे पाठवावेत ते सोशल मिडीयावर प्रसिध्द केले जातील असे आवाहन निम्हण यांनी केले आहे.तसेच या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन करोनाशी पहिल्या आघाडीवर दोन हात करणाऱ्या योध्दांचा सन्मान करावा असेही ते म्हणाले.व पुणेकर नागरिकांना नम्र आवाहन आहे की या उपक्रमात सहभागी होऊन आपण सर्वांनी कोरोना योद्धा ना एक आगळी वेगळी मानवंदना द्यावी.चला निर्धार करू … कोरोना हद्दपार करू !
पुणे सामाजिक व राजकीय प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे