पुणे दि ३१ : – पुणे परिसरातील बालेवाडी येथे स्नूकर खेळण्यास स्टिक न दिल्याच्या रागातून तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ‘कबाना क्लब लो स्ट्रीटमध्ये’ रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी अभिषेक दिनेश साहू (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात मनोज धनकुडे, गणेश यांच्यासह तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला.चतुर्श्रुंगी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक साहू हे मित्र कुणाल मलिक याच्यासोबत बालेवाडी येथील कबाना क्लब लो स्ट्रीट येथे स्नूकर खेळण्यास गेले होते. यावेळी आरोपी देखील येथे आले होते. अभिषेक हे स्नूकर खेळत असताना त्यांना आरोपींनी स्टिक मागितली.
पण स्टिक अभिषेक यांनी दिली नाही. याचा राग आरोपींना आला. त्यांनी फिर्यादीसोबत वाद घातला. तसेच यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र कुणाल मलिक यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.तर मनोज याने फिर्यादीच्या छातीवर स्नूकर स्टिकने मारहाण केली. यात फिर्यादी व त्यांच्या मित्राला मुक्कामार लागला आहे. त्यांनी कुटुंबाला सांगितले. यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास चतुर्श्रुंगी पोलिस करत आहेत