कर्जत दि२७ :- मोबाइलवरील ऑनलाइन गेम मुलांसाठी किती धोकादायक ठरु शकतात याचा विचार करायला लावणारी घटना कर्जत येथे घडली.आहे ऑनलाइन गेम खेळण्यातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या तीन दिवसात शोध लावून कर्जत पोलिसांनी मोठे यश मिळविले असून विदर्भातून आरोपीस अटक करत या मुलीची सुटका करून पालकांच्या स्वाधीन केले आहे.दि.२०मार्च रोजी वयाने अगदी लहान (१४ वर्षे) असलेली पीडित मुलगी घरात नसलेबाबत आई-वडिलांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. याबाबत कर्जत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान गणेश ठोंबरे, तुळशीदास सातपुते असा पूर्ण वेळ स्टाफ तपासकामी नेमला. घटनास्थळावरून अपेक्षित माहिती मिळात नव्हती. काही मुलं आणि मुली ऑनलाइन फ्री फायर गेम खेळत होती. त्यामधून पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि गोपनीय खबऱ्याकडून आणि तांत्रिक माहिती वरून बाळापूर, जिल्हा अकोला येथे सदर पीडित मुलगी आहे अशी गोपनीय माहिती मिळाली.त्यावरून तात्काळ सदर ठिकाणी पोलीस अधिकारी आणि जवान यांना रवाना केले.व रात्री ३:३० वाजण्याच्या दरम्यान आरोपी मिथुन पुंडलिक दामोदर, वय २४ वर्ष रा. सगद ता. बाळापुर जि. अकोला याचे घरून मुलीला आणि आरोपीला ताब्यात घेऊन कर्जत येथे आणले गेले.मिळालेली अधिक माहिती अशी की,फ्री फायर खेळत असताना आरोपी मुलाशी प्रथम मुलीच्या भावाशी ऑनलाइन ओळख झाली. त्याला ३ हजार रु.चा गेम रिचार्जे केला. तो त्या मुलांसोबत खेळू लागला. काही दिवसात मुलाच्या बहिणीबरोबर सुद्धा फ्री फायर ही गेम खेळू लागला. मुलीशी जास्त बोलणं सुरू झाले. गेम मधेच बोलणं, मेसेज सुरू होते.मुलगी वयाने अतिशय लहान असल्याने तिच्या लक्षात आलं नाही आणि फूस लावून पळवून नेले. तपासात आरोपीला मुलीचे नातेवाईका समक्ष पोलिसांनी फोन करून माहिती विचारली असता माझे लग्न ठरले आहे, साखरपुडा झाला आहे. अशी खोटी माहिती देऊन दिशाभूल करत दुसऱ्याच मुलीसोबत तयार केलेला बनावट फोटो पाठवून दिला होता.कोणत्याही गोष्टीचा धागादोरा नसताना कर्जत पोलिसांनीअवघ्या 3 दिवसातच 650 km वर असलेल्या मुलीला अत्यंत शिताफीने शोधून आणल्याने कर्जत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान आठ, राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अंमलदार तुळसीदास सातपुते, गणेश ठोंबरे, मोबाईल सेलचे नितीन शिंदे, मारुती काळे, सागर म्हेत्रे, बळीराम काकडे, गणेश भागडे, संपत शिंदे यांनी केली.आज काल ऑनलाइन शिक्षणा मुळे पालकच मुलांच्या हातात मोबाईल देत असतात मात्र दरम्यान आपली लहान मुले मोबाईल वर काय करतात याकडे आई, वडील, नातेवाईक यांनी लक्ष देणे आवश्यक आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे