पुणे ग्रामीण दि २७ :- पुणे जिल्हा सह ईतर ठिकाणी टोलनाकावर बनावट पावती प्रकरणात,व घोटाळ्याचा आकडा सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व आरोपींना अटक करण्यात आले होते व पुणे सातारा बेंगलोर महामार्गावर खेड शिवापूर टोलनाका आहे.तसच इतर ठिकाणी हजारो वाहने येथून दररोज ये जा करतात. पण काही दिवसा पूर्वी या टोलवर बनावट पावत्या देऊन वाहनांना सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करत 7 जणांना अटक केली होती.व
या टोलचे काम हे एका खासगी कंपनीकडे आहे. शासनाला टोलचा महसूल जातो. पण आरोपी हे 190 रुपयांची बनावट पावती तयार करत तसेच पुणे सातारा टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी देते असे सांगून वाहन चालकाकडून पैसे उकळत होते. दरम्यान पोलिसांनी 24 तासांचा टोलचा रिपोर्ट काढला आहे. त्यात 3 हजार वाहने येथून जात असल्याचे दिसत आहे. त्यात 3 लाख 80 हजार बनावट पावत्या दिल्या असल्याचे दिसत आहे. यात जवळपास दोन महिन्यात 2 कोटी 28 लाख रुपयांचा टोल यामाध्यमातून वसूल केला असल्याचा अंदाज आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. काल रात्री पुण्याकडून सोलापूर जाणार पहिल्या टोल वर सोलापूर कडून पुण्यात येत आसताना नवीन फंडा पाहायला मिळाला आहे फास्टट्रॅक अकाउंट मध्ये पैसे असून सुद्धा टोल नाक्यावरील कर्मचारी म्हणाला तुमच्या फास्ट मध्ये पैसे नाहीये व 150 रूपये चा तोल देवा लागेल व मुळ 75 आसून तिथे 150 रु डबल चार्जेस लावून पावती देण्याचा प्रकार सोलापूर रोड येथे काल आमच्या प्रतिनिधीने पाहिला मिळाला आहे व त्यांना आमच्या प्रतिनिधीने ही अकाउंटला पैसे आहे तेही दाखवून त्यांनी त्याच्या संगे अरेरावीची भाषा करून गाडी फास्ट ट्रॅक मध्ये पैसे नाही व कॅश पावती कर त्याला आमच्या प्रतिनिधीने सांगितले की माझ्या गाडीच्या मागे ट्राफिक जाम होत आहे माझी पाचशेची नोट तुझ्याकडे ठेव व नंतर व मी गाडी साईट ला घेऊन व्यवस्थित चेक कर मग त्याने परत एकदा स्कॅन करून पाहिल्याचे नाटक केले व म्हणाला की तुमचा अकाउंट मधून टोलचे पैसे कट झाली आहे व पुढे जा अशी भाषा करून आमच्याया प्रतिनिधीला ला टोल कर्मचाऱ्याकडून वागणूक मिळाली आहे व नागरिकांना त्रास देण्याचे काम चालू केले आहे तसेच यावर प्रशासानाने लक्ष घालून टोल नाक्यावर चाललेला अंदाधुंदी कारभार थांबावा हे पुणेकर नागरिकांची आशा आहे व अशा टोल नाक्यावर डुबलीकेट पावत्या व इतर फसवणूक होण्याची दाट शक्यता वाटत आहे