कर्जत दि २५ : -लग्न म्हटलं की विश्वासाच्या नात्यातून दोन परिवार एकत्र येतात अन पती पत्नीच्या संसाराची सुरुवात होऊन दोघेही सुखी संसाराची स्वप्न रंगवतात. अशात याच नात्याचा विश्वासघात झाल्याची घटना घडली तर ती असह्य होते. मात्र, कर्जत तालुक्यातील एका गावात १०/०३/२०२१ रोजी असाच प्रकार घडलाय. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने दि.२२/०३/२०२१रोजी फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार कर्जत पोलिसांनी पैसे घेऊन बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय.या प्रकरणी ४ जणांच्या टोळीला कर्जत पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.या आरोपीमध्ये २पुरुष व २ महिलाचा समावेश आहे.आरोपी राजू वैजनाथ हिवाळे रा. सिंहरोड, पुणे,विलास जोजरे रा. हिंगोली,मंगलबाई दत्तात्रय वाघ रा. पोखर्णे, सोनपेठ, परभणी,पल्लवी गोमाजी सगट रा. मोहाला, सोनपेठ, परभणी यांचा समावेश आहे.लग्न जमवून देणाऱ्यांनी पल्लवी गोमाजी सगट रा. मोहाला, सोनपेठ, परभणी हिचे यापूर्वी तीन वेळा लग्न लावून दिले होते तरी फिर्यादीशी कायदेशीर पणे लग्न करावयाचे नसताना फसविण्याच्या उद्देशाने कायदेशीर विवाह न करता कपटीपणाने विवाह संस्कार उरकुन घेतला व फिर्यादीची २ लाख १० हजार रुपयाची फसवणूक केली आहे.त्यापैकी ६० हजार रुपये आरोपी न कडून हस्तगत करण्यात आले आहे. लग्नगाठी या सात जन्मासाठी बांधल्या जातात असं म्हणतात, मात्र ही म्हण खोटी ठरवत पैशासाठी आता खोट्या लग्नगाठी बांधल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लग्नासारख्या पवित्र नात्यालाच काळिमा फासल्याचा प्रकार घडलाय.
सविस्तर वृत्त असे की,मंगलाबाई दत्तात्रय वाघ ही टोळीप्रमुख होती. मंगलाबाई विवाह जमत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी संपर्क साधत असे. त्यानंतर त्यांच्याकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन टोळीतील एका महिलेला त्याच्याशी विवाह करण्यासाठी तयार करायची.मंगलाबाई ही नवरीची मावशी असल्याचे भासवत असायची विवाह झाल्यानंतर संबंधित तरुणी सहा ते सात दिवस सासरी राहत असे. अशाप्रकारे काही जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, समाजातील प्रतिष्ठेपोटी हे नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक मनोज पाटील,
अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,
उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
पो.स.ई भगवान शिरसाठ,पोलीस जवान मारुती काळे, तुळशीदास सातपुते, सागर म्हेत्रे, भाऊ काळे, गणेश भागडे, ठोंबरे, संपत शिंदे यांनी केली.पुढील अधिक तपास पो.हे.कॉ.काळे करत आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे