श्रीगोंदा दि.२५:-प्रशासनाच्यावतीने शिधापत्रिकांची तपासणी सध्या सुरु आहे.शिधा पत्रिका (रेशनकार्ड) धारकाकडून रेशन दुकानदार एक हमीपत्र भरुन घेत आहेत. त्या हमीपत्रात असे सांगितले आहे की “जर माझ्या किंवा माझ्या शिधा पत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस असेल तर माझी शिधा पत्रिका रद्द केली जाईल”.भारतात जे लोक दारिद्र्यरेषेखाली रहात आहेत. त्यांना या शिधा पत्रिकेमुळे स्वस्त दरात धान्य भेटते. या हमीपत्राच्या माध्यमातून सरकारने दारिद्रय रेषेखालील लोकांची शिधा पत्रिका रद्द करण्याचे धोरण आखले आहे. यातून ब्राह्मणवादी आर.एस.एस. ने मोदींच्या माध्यमातून मूलनिवासी भारतीयांचा सामूहिक नरसंहार करण्याचे ठरवले आहे हे स्पष्ट होत आहे.जर सरकारने हे हमीपत्र लिहून घेणे तात्काळ थांबवले नाही तर बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून या हमीपत्राच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.दिनांक 26-03-2021 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात प्रत्येक रेशनिंग दुकानावर जाऊन या हमीपत्राची दुकानासमोर होळी करण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.याचे निवेदन तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांना देण्यात आले आहे.दुसऱ्या टप्प्यात दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी राज्यातील प्रत्येक तहसीलदार कचेरीवर हजारो लोकांच्या उपस्थितीत आंदोलन केले जाईल. त्याची जबाबदारी शासनावर असेल.असा इशारा देखील बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांनी दिला आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टी शहराध्यक्ष सुभाष बोराडे, दादा शिंदे, कालिदास सावंत, भाऊसाहेब फुलमाळी, बापू काकडे, भारत शिंदे, लक्ष्मण सावंत, शेटीबा पवार, सुनील काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे