पुणे विभागातील 6 लाख 34 हजार 577 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरीच;विभागात कोरोना बाधित 7 लाख 826 रुग्ण
पुणे, दि. 24 :- पुणे विभागातील 6 लाख 34 हजार 577 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 826 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 376 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 873 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.55 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 79 हजार 521 रुग्णांपैकी 4 लाख 27 हजार 400 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 42 हजार 573 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 548 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.99 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.13 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 62 हजार 584 रुग्णांपैकी 58 हजार 613 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 88 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 57 हजार 319 रुग्णांपैकी 52 हजार 340 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 71 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 999 रुग्णांपैकी 47 हजार 123 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 100 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 776 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 403 रुग्णांपैकी 49 हजार 101 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 544 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 6 हजार 470 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 5 हजार 722, सातारा जिल्ह्यात 159, सोलापूर जिल्ह्यात 381, सांगली जिल्ह्यात 143 तर कोल्हापूर जिल्ह्यात 65 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 688 आहे. पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 126, सातारा जिल्हयामध्ये 357, सोलापूर जिल्हयामध्ये 118, सांगली जिल्हयामध्ये 45 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 42 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 46 लाख 514 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 70 हजार 826 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 23 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )