नवी दिल्ली :- देशभरातील केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यावर देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी २७ डिसेंबर रोजी तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आज संध्याकाळी सात ते रात्री 10 या वेळेत केबल सेवा बंद ठेवणार आहेत. या आंदोलनामुळे प्रेक्षक ‘प्राइम टाइम’मधील अनेक मालिकांना मुकणार आहेत. तसेच यासंदर्भात चर्चा करण्य़ासाठी केबल व्यावसायिकांची आज मुंबईत बैठक होणार आहे.
केबल व्यावसायिकांनी ट्रायच्या नव्या धोरणांवर आरोप केले आहेत की, नव्या धोरणातील नियम आखताना ट्रायने केबल, डीटीएच सेवा देणाऱ्या घटकांचे भविष्य अधांतरी ठेवले आहे. तसेच नवे नियम ग्राहकांच्या हिताचे नाहीत. ट्रायच्या नव्या नियमांचा निषेध नोंदवण्यासाठी केबल व्यावसायिक आज लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. यावर मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी ताशेरे ओढले आहेत. ग्राहकांना कशा प्रकारे तोटा होणार आहे हे केबल व्यावसायिकांनी आम्हाला सांगावे. तसेच ग्राहकांना वेठीस न धरण्याचेही आवाहन शिरीष देशपांडे यांनी केलं आहे.
ट्रायने घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांना तोटा नसून याचा ग्राहकांना निश्चितच फायदा होणार असल्याचे देशपांडे म्हणाले. तसेच आपल्याला जे चॅनेल पाहिजे आहे तेच बघण्याचं स्वातंत्र्य या निर्णयामुळे मिळणार आहे. या आधी भरमसाठ चॅनेल ची किंमत मोजली जायची. आता या सर्व गोष्टींना आळा बसणार असल्याचे शिरीष देशपांडे म्हणाले.
प्रत्येक ब्रॉडकास्टरने आपला वेगवेगळा चॅनेल त्याची किंमत जाहीर करून दिली पाहिजे. ट्रायच्या या निर्णायामुळे ग्राहकांचं याच नुकसान कसं आणि कुठे होत
ग्राहकांनी त्यांना किती चॅनेल हवे आहेत ते केबल व्यावसायिकांना सांगायचे आहे आणि फक्त त्याचेच पैसे भरायचे आहेत. प्रत्येक पे चॅनेलची किंमत काय असणार आहे हे दाखवलं जाणार आहे, त्यामुळे यात पारदर्शकपणा येणार असल्याचेही शिरीष देशपांडे म्हणाले
पुढील महिन्यांपासून दर महिन्याला किती खर्च होणार?
नेटवर्क फी म्हणून ग्राहकांकडून 130 रुपये आणि त्यावरील टॅक्स घेतला जाईल. ज्यामध्ये ग्राहकांना 100 फ्री टू एअर चॅनेल्स दिले जातील त्यापैकी 26 चॅनेल्स हे दूरदर्शनचे आहेत. दूरदर्शनचे चॅनेल्स ग्राहकांना देणे अनिवार्य आहे. हे सर्व चॅनेल्स ट्रायने निवडलेले आहेत. यापेक्षा जास्त आणि आवडीचे चॅनेल्स पाहण्यासाठी ग्राहकांना त्या-त्या चॅनेलच्या बेस प्राईस रेंजनुसार पैसे द्यावे लागतील. चॅनेल्सची सबस्क्रिप्शन प्राईस रेंज 1 ते 19 रुपये इतकी आहे. आवडीच्या 25 चॅनेल्ससाठी अतिरिक्त 20 रुपये द्यावे लागतील.