श्रीगोंदा दि ०७ : -श्रीगोंदा वकील संघाची निवड नुकतीच बिनविरोध झाली.वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने सन २०२१-२२ या कालावधी करिता निवडणूक निर्णय अधिकारी अॅड . आर के आचार्य यांनी दि. ५ मार्च २१ रोजी
निवडणूक घोषित केली होती.वकील संघातील वकील बांधव एकजुटीने वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी सर्वानुमते निवडत आलेले आहेत. त्याआधारे श्रीगोंदा वकील अध्यक्ष
पदाकरिता सदाशिव कापसे, उपाध्यक्ष पदाकरिता अॅड. जयंत शिंदे तसेच महिला प्रतिनिधी करिता अॅड. विजया घोडके तसेच सचिव पदाकरिता अॅड. होले खजिनदार पदकरिता अॅड.फटे
यांनी नामनिर्देश पत्र निवडणूक अधिकारी यांचेकडे दाखल केले होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदाकारिता इतर कोणाचेही नामनिर्देशन पत्र आले नाही. त्यामुळे श्रीगोंदा वकील संघाच्या
अध्यक्ष पदी अॅड. सदाशिव कापसे, उपाध्यक्ष पदी अॅड. जयंत शिंदे, महिला प्रतिनिधी अॅड. विजया घोडके, सचिव पदी अॅड. होले, खजिनदार पदी अॅड. फटे यांची निवडणूक अधिकारी साहेब अॅड. आर. के. आचार्य यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे निकालांची घोषणा झाल्यावर विजयी उमेदवारांचा उपस्थित वकिलांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार
केला.यावेळी अॅड. बापूसाहेब भोस, अॅड. गायकवाड, अॅड. रमेश जठार, अॅड. संदीप भोयटे, अॅड. महेश लोणकर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या हितासाठी काम केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी श्रीगोंदा वकील संघांचे सर्व सदस्य उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे