कर्जत दि.५:-कर्जत पोलीस ठाण्याच्यावतीने आज दि.५ रोजी ६:३०वाजता दुकानदार,पेट्रोल पंप,व्यापारी व ज्वेलर्स या व्यापारी असोसिएशनच्या पदाधिका-यांची बैठक नुकतीच राशीन येथे आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी राशीनच्या सुरक्षेकरिता ‘एक कॅमेरा चौकासाठी’ ही अभिनव संकल्पना मांडली व या संकल्पनेला व्यापाऱ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. राशीन शहरातील प्रत्येक चौकात हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी राशीन शहरात करमाळा चौक, भिगवण चौक, आंबेडकर चौक, बस स्थानक परिसर, शिवाजी चौक या मुख्य ठिकाणी लोक सहभागातून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मुख्य चौकात लोकसहभागातून सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविणार आहोत. सदरचे महत्वाचे ठिकाणचे कॅमेरे ५ ते ६ व्यापारी मिळून बसविणार आहेत. या कॅमे-यांव्दारे वाहनांचे नंबर प्लेटही स्पष्टपणे दिसतील या पध्दतीचे सी.सी.टीव्ही कॅमेरे असणार आहेत असेही सांगण्यात आले होते. संपूर्ण राशीन मधील सीसीटीव्ही कॅमेरा या तिस-या डोळयातून लक्ष ठेवणे शक्य होईल तसेच पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यास मोलाची मदत होईल.राशीन शहरांमध्ये चोरी, लूटमार, दरोडे यासारख्या घटना वाढत चालल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच राशीन व शहरातील व्यापारी, ज्वेलर्स व दुकानदार यांच्या सुरक्षिततेसाठी कर्जत पोलिसांनी ‘एक कॅमेरा चौकासाठी’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्याच्यी भूमिका स्वागर्ताह आहे. राशीन शहरातील ट्राफिक व बाजारपेठेतील ट्राफिक यावर नियोजना बाबत चर्चा केली,वाहतूक नियंत्रणाबाबत समाधान व्यक्त केले.या मिटींग साठी ५० ते ६० व्यापारी बांधव उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे