पुणे दि ०३ :- श्रीनगर येथे होणाºया १७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघ जाहीर झाला आहे. जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमधून महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली होती. पुण्याची आयुषा इंगवले महिला संघाचे, तर मुंबईचा विशाल जाधव पुरुष संघाचे नेतृत्व करणार आहे. शुक्रवार दिनांक ५ मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
संघाला भारतीय आॅलम्पिक संघटनेचे सहसचिव व महाराष्ट्र आॅलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव शिरगावकर महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, सहसचिव रवींद्र सोनवणे, जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेचे सचिव दीपक आर्डे, खजिनदार कृपालसिंह ठाकूर, शेखर पोळ, विजय पळसकर, विठ्ठल शिरगावकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शुक्रवार दिनांक ५ मार्च ते सोमवार दिनांक ८ मार्च या दरम्यान स्पर्धा होणार आहे. प्रा.अमोल पाटील यांची संघ प्रशिक्षक म्हणून तर राकेश पाटील यांची संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा संघ-
पुरुष- विशाल जाधव, ऋतुराज सुवर्णकार , राहुल उगलमुगले, घनश्याम कोळी, वीर जैन, जयवंत मदणे, संदीप व्यवहारे, कल्पेश वंजारी
पुरुष- विशाल जाधव, ऋतुराज सुवर्णकार , राहुल उगलमुगले, घनश्याम कोळी, वीर जैन, जयवंत मदणे, संदीप व्यवहारे, कल्पेश वंजारी
महिला- मेघना नाईक, पौर्णिमा चव्हाण, निकिता भोई, स्नेहल पाटील, प्रतीक्षा शेरकर, प्रेरणा देशमुख, आयुष इंगवले.
*फोटो ओळ – श्रीनगर येथे होणाºया १७ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेकरीता निवड झालेला महाराष्ट्राचा संघ मुबंई येथून स्पर्धेसाठी रवाना झाला.