पुणे दि २२ :- पुण्याजवळील शिक्रापूर केसनंद येथे राहणारा टिकटॉक (Tik-Tok) स्टार समीर गायकवाड याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे पुणे शहराजवळील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड (वय 22) ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरवून लाईफ लाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.लोणीकंद पोलिसांनी माहिती दिली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.या प्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.समीरने आत्महत्या केल्याचं कळताच प्रफुल्ल गायकवाडने लोणीकंद पोलिसांना याची माहिती दिली. समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. तो म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवायचा. समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याची रेडलाईट डायरीज ही ब्लॉगवरील मालिका चांगलीच गाजली होती. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता.