पुणे दि २०: -मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात पाषाण परिसरात सोमेश्वर वाडी गोविंद मंगल कार्यालय शेजारी ग्राउंड वर सोमेश्वर स्पोर्टस क्लब आयोजित भव्य डे नाईट हाफ पिच क्रिकेट क्रिकेट स्पर्धेचे दि २० रोजी सोमेश्वर स्पोर्टस क्लब आयोजित भव्य डे नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन नगरसेवक अमित गावडे, राहुल कलाटे, विशाल यादव व बांधकाम व्यवसायीक अभय मांढरे यांच्या हस्ते झाले व आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २० फेब्रुवारी ते २ मार्च २०२१ या कालावधीत रंगणार आहे. मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण अधिक माहिती देताना, त्यांनी महिती दिली कि
आज दि २० रोजी या स्पर्धेत पुणे शहरातील सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 64 संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.व आज स्पर्धेत 8 संघ झुंजणार असल्याचे त्यांनी नमूद केले.स्पर्धेचे सलग 8 यशस्वी वर्ष असून ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या,
उपविजेत्या व प्रथम क्रमांक रू ३५ हजार ५५५ , द्वितीय क्रमांक रू २५ हजार५५५ तृतीय क्रमांक रू .१५ हजार५५५ सलग ३ चौकार सलग ३ बाद सलग ३ षटकार रू .१,५५५ / रू .१,५५५ / रू . १,५५५ / क्रमांकासाठी करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि
मालिकावीर यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्पर्धेच्या सामन्यांचे निकाल २ मार्च येथे उपलब्ध असणार असून सामन्यांचे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये विठ्ठल सेवा मंडळ व सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे.