पुणे दि २०:-पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या पाहता प्रशासनाकडे विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. पुणेशहरात देखील दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने शुक्रवार पासून मास्क न लावणार्या नागरीकांसह वाहनधारकांवर 500
रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली जात आहे. आज दि 20 रोजी पुणे महानगरपालिकेच्याच्या कर्मचारी व पोलीस मदतीने चतुश्रीगी परिसरात कारवाई करून दंड वसुल करण्यात आला.पोलिसांकडूनही प्रभावी जनजागृती पुणे शहर पोलिसांकडून त्यांच्या हद्दीत पोलिस नागरिकांना सूचना देण्यात येत आहे की, कोरोनाच्या पा्र्श्वभुमीवर प्रत्येकाने तोंडाला मास्क लावा अन्यथा पोलिसांकडून कारवाई सुरू केली आहे.मास्क नसल्याने प्रत्येकी 500 रूपये नुसार दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई दररोज केली जाणार असल्याचे वाहतूक शाखा व पुुणे महानगरपालिका कर्मचार्यांनी यांनी सांगितले आहे