रत्नागिरी दि २७ :- शासनाने महाराष्ट्रामध्ये कार्बन क्रेडिट योजना अंमलात आणावी निसर्ग प्रेमी अनंत मोरे गुहागर -कोकण पर्यावरण फाऊंडेशन अध्यक्ष तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ . महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुक महाराष्ट्र हरित सेना वन विभाग सदस्य . अनंत मोरे .व मंडळाचे वरिष्ठ कार्या अध्यक्ष विलास राव महाडीक याची वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन संबंधी अशी धारणा आहे की ऊपाशी पोटी कोणी झाडे लावणार नाहीत .आणि घरात खर्चाला पैसा नसेल तर असणारी झाडे तोडल्याशिवाय राहाणार नाहीत. कोकणात जी जंगल आहेत .ती खाजगी मालकीची आहेत .आणि काही जंगले ठरावीक लोकांची आहेत त्यामुळे जगातील मोठ मोठी झाडे लाकुड व्यापारी यांना विकून स्वतः ची श्रीमंती
वाढवितात व काही झाडे सामान्य रोजंदारी करणाऱ्या लोकांच्या जागेत आहेत पण त्याच्या पोटापाण्यासाठी असणारी झाडे ती विकून आपला चरितार्थ चालवितात.त्यामुळे अजुनही कोकणात रस्त्याच्या कडेला झाडे तोडुन लाकडाचे ढिग लावून वाहतूकीसाठीवाट पहात आहेत .हे ढिग सर्वांना दिसतात पण कोणी कार्य वाही करीत नाही .यासाठी नवीन लावणाऱ्या झाडासाठी व असणाऱ्या झाडासाठी सरकारने कार्बन क्रेडिट योजना आखुन द्यावी जे कार्बन तयार करतील त्यामध्ये मोटार सायकलवाले.फोरव्हिलरवाले.ट्रंकवाले सर्व वाहनवाले व कारखानदार यांच्या वर कार्बन tax बसवावा.व जे कार्बन प्रमाण कमी करणारी कमी करणारी झाडे लावतील त्यांना कार्बन क्रेडिट द्यावे .म्हणजे झाडाच्या बदल्यात वर्षाला ठराविक रक्कम ठरवुन द्यावी .त्यामुळे असणारी झाडे.वाचतील व त्याचे संगोपन व संवर्धन होईल कोणीही आपली झाडे तोडणार नाही .कीव्हा विकणार नाही .यासाठी झाडाच्या घेरानुसार कीव्हा झाडाच्या वयानुसार वर्षाला रक्कम ठरवुन द्यावी म्हणजेच क्रेडिट देण्यात यावे.जर कार्बन क्रेडिट दिले गेले तर दहा पंधरा वर्षात महाराष्ट्र भुईसपाट होण्यास वेळ लागणार नाही मोठी झाडे शिल्लक राहाणार नाहीत . आणि याचा दुष्परिणाम सर्वाना भोगावा लागले . ग्लोबल वार्मिगचा फार मोठा दुष्परिणाम महाराष्ट्रावर होईल यासाठी झाडे लावणाऱ्या व ज्याची झाडे सध्या आहेत .या दोघांनाही कार्बन क्रेडिट देण्यात यावे.ह्या पद्धतीचा अवलंब शासनाने लवकरच करावा यासाठी कोकण पर्यावरण फांऊडेशनचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री .पर्यावरण मंञी.आणि ग्राम विकास मंञी यांना पञव्यहार करणार आहेत ,अशी माहीती अध्यक्ष अनंत मोरे यांनी दीली .आॕक्सिजनचे प्रमाण वातावरणात २०% ने कमी झाले आहे .वातावरणात तापमान वाढ दिवसेंदिवस वाढ होत आहे . ढगपुटीचे प्रमाण वाढले अवेळी पाऊस पडणे .जमिनीची धूप वेगाने होत आहे .नद्या नाले मातीने भरले. आहेत .शेतकरी वर्गाला तयार झालेली पिके अवकाळी पाऊसामुळे त्याच्या हातात येत नाहीत .वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढत चालले आहे.त्यामुळे लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे.आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठीव ग्लोबल. वार्मिग चा दृष्परिणाम टाळण्यासाठी आणि पुढील पिढीला शुद्ध हवा आणि पाणी आरोग्यदाई जीवन मिळावे यासाठी कार्बन क्रेडिट आवश्यक आहे .शासनाने वरिल गोष्टीचा विचार करुन ही योजना राबविण्यात यावी. प्रत्येक शेती बांधावर शेतात १००मीटर घेर असणाऱ्या झाडाला १००/रुपये व ३०० मीटर घेर असणाऱ्या झाडाला रु.१००० /- अनुदान देण्याची योजना राबवली तर हिच योजना राज्य सरकारने राबवली तर जंगलं वाचतील .लोकांचा कल झाडे लावुन ती जगविण्यासाठी धडपड करतील.