पिंपरी चिंचवड दि ०२ :-देहुरोड परिसरात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्या हॉटेल मालकावर छाप टाकुन कारवाई केले आहे . दिनांक ०१ डिसेंबर रोजी १७:४० वाजताचे सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने देहुरोड परिसरात अवैद्यरित्या दारुची विक्री चालु असलेल्या हॉटेल मालकासह हॉटेलचे मॅनेजरवर कारवाई करण्यात आली. कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैद्य धंद्याबाबत प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले होते याच अनुषंगाने सामाजिक सुरक्षा विभाग , पिंपरी चिंचवड यांचे पथक देहूरोड पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार देहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत , देहू आळंदी रोडलगत , मारूतीनगर , विठ्ठलवाडी ता.हवेली जि.पुणे येथील हॉटेल एम.एस तुळसाई व्हेज – नॉनव्हेज मटन खानावळ येथे अवैद्यरित्या देशी – विदेशी दारु तसेच बियरची विक्री करत असल्याचे समजले आसता सामाजिक सुरक्षा विभाग , यांच्या पथकाने सदर ठिकाणी हॉटेलच्या थोड्या अंतरावर आडबाजुस थांबुन बातमी प्रमाणे छापा टाकून हॉटेल समोर एक ग्रे रंगाची एम.एच -१४ एफ.एम ५१४४ या क्रमांकाची इनोव्हा चारचाकी कार हीचे मधून एक इसम देशी विदेशी दारूच्या व बियरच्या बाटल्याचे बॉक्स हॉटेलमध्ये घेवून जात असताना दिसल्याने या पथकाने छापा टाकला असता कार मध्ये तसेच एम.एस तुळसाई हॉटेलवर १० लाख ३६ हजार ८८८ रूपयाचा मुद्देमाल घटणास्थळावर मिळून आला हॉटेल मालक नामे १ ) सुनिल धनराज पाटील वय २५ वर्षे रा . आंबेठाण , चाकण ता.खेड जि.पुणे व हॉटेल मॅनेजर नामे २ ) भगवान सूरेश पाटील वय ३० वर्षे रा . हॉटेल एम.एस तुळसाई , पुणे यांचे विरूद्ध देहूरोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देहूरोड पोलीस ठाणे करत आहे .. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त. कृष्ण प्रकाश.अपर पोलीस आयुक्त.रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे. सुधीर हिरेमठ , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे. आर.आर.पाटील , सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. विठ्ठल कुबडे साो , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक डोंगरे , सपोफौ विजय काबंळे , पोहवा सुनिल शिरसाठ , पोना भगवंता मुठे , पोना नितीन लोंढे , पोना अनिल महाजन , मपोना वैष्णवी गावडे , पोना अमोलशिंदे , पोशि गणेशकरोटे , पोशि मारूती करचुंडे , पोशि योगेश तिडके यांनी केली आहे .