पुणे दिि २६ :-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अद्यक्ष मा. श्री. मेघराज राजेभोसले यांचा वाढदिवस पूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. या निम्मिताने पुण्यातील चित्रपट ,नाट्य व लोककला क्षेत्रातील कलावंत , तंत्रज्ञ , कामगार यांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात अली . याचवेळी कलावंतांना मोफत आरोग्य विमा देण्यात आला . डॉ शंतनू जगदाळे यांनी या प्रसंगी कलाकारर्ण भेटवस्तू दिल्या . तसेच आम्ही पुणेकर व हडपसर मधील कलावन्तांनी अध्यक्षांची धान्य तुला केली व ते धान्य गरजू कलावंतांना देण्यात आले. याप्रसंगी अभिनेते माधव अभ्यंकर , अभिनेत्री सुवर्णा काळे , शहाजी पाटील, आरपीआय राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी , निर्माता अनिल गुंजाळ , अभिनेता प्रशांत बोगम , अभिनेता नागनाथ गावसाने , निर्माते दत्ता दळवी , जर्नालिस्ट अससोसिएशनचे अध्यक्ष समीर देसाई , आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव,अभिनेता किचू भिंगारे , अभिनेता कुणाल देशमुख व इतर कलावंत उपस्थित होते.
श्री . मेघराजराजे भोसले यांचा वाढदिवस नाशिक मध्ये आरोग्य शिबीर घेऊन ज्येष्ठ कलावंतांनी फळाचे वाटप करून, औरंगाबाद येथे ब्लॅंकेट वाटप , भाळवणी येथे शनी मंदिरात अभिषेक व प्रसाद वाटप , अहमदनगर येथे कलावंतांना ब्लॅंकेट वाटप व जालना वृद्धाश्रमात फळांचे वाटप , तसेच कोल्हापूर ,मुंबई , नागपूर , बीड , सातारा ,या ठिकाणीही विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले .
आपल्या वाढदिवसाच्या निम्मित घेतलेल्या उपक्रमणांना उत्तर देताना मा. मेघराजराजे भोसले यांनी सर्व कलावंतांचे , सभासदांचे आभार मानले व शासन दरबारी कलावंतांचे प्रश्न प्राधान्याने मांडण्याचे सूतोवाच केले .