पुणे दि २६ :- आज गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेची एसटी बस साताऱ्याकडून मुंबईकडे एक्सप्रेस वे वरून निघाली होती. ती पनवेलकडे जाणाऱ्या बाह्य वळणाजवळ आली असताना अज्ञात वाहनाला ती घासली गेली. त्यामुळे अक्षरशः बसच्या एका बाजूच्या चिंधड्या उडाल्या. त्या बाजूला बसलेले आणि झोपेत असलेले जवळपास सर्वच प्रवासी त्यामुळे गंभीर जखमी झाले. एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. MGM हॉस्पिटलमध्ये
दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्ती बेस्ट ड्रायव्हर होती, अशी माहिती कळते आहे. माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बसला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने भीषण अपघात झाला.एसटी बस साताऱ्याहून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात एसटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बसमधील आसन व्यवस्था तसेच एका बाजूचा बसचा पत्रा पूर्णपणे निखळला आहे. वाहतूक पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये 16 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.या धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळच असलेल्या देवदूत यंत्रणेच्या तळावरून सगळे जवान त्या ठिकाणी धावले. हाकेच्या अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीसांच्या पळस्पे टॅपचे कर्मचारी देखील काही क्षणात मदतीला आले. आय. आर. बी. पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि लोकमान्य हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स सेवा त्वरित उपलब्ध झाली. रेस्क्यू
ऑपरेशन सुरू असताना रात्रीच्या अंधारात फक्त किंकाळ्या आणि विव्हळणे ऐकू येत होते.सगळ्या यंत्रणांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून जखमींना तातडीने MGM हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले, त्यामुळे मोठी जीवित हानी टळली असली तरी मृत्यूचे भय अजून घोंगावत आहे, आरोग्य यंत्रणा योग्य उपचार करत आहे. धडकेत एका प्रवाशाला मृत्यूने गाठले आहे आणि इतरांच्या जखमाही गंभीर स्वरूपाच्या आहेत