पुणे ग्रामीण दि ०२ :पुणे ग्रामीण नारायणगाव हद्दीतील 14 नंबर चौक परिसरात दुप्पट पैसे देतो’ असे अमिष दाखवून बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे.प्रमोद भगवान साळवे, बाबासाहेब बापू दाते (दोघे रा. कासारी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), समीर दशरथ वाघ (रा. गुर्वेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), अमोल बन्सी भोसले (रा. भोसलेवाडी-टेमदरा, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी बाळू कारभारी पवार यांनी नारायणराव पोलीस ठाण्यात बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याची मंगळवारी (दि.१) फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी बाबासाहेब दाते हा फिर्यादी पवार यांना मागील १५ दिवसांपासून वारंवार फोन करून नोटा दिल्यास त्या लगेच डबल करून देतो, असे अमिष दाखवत होता. पवार यांनी नकार देऊनही आरोपी वारंवार फोन करत होता.मंगळवारी आरोपीने पवार यांना नारायणराव येथील १४ नंबर चौकात वडा पाव सेंटरजवळ बोलावून घेतले. चौघे आरोपी पल्सर दुचाकीवरून (एमएच १४ जीक्यू ५८४१) आले. त्यांनी पवार यांच्याकडून २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर ५० हजारांचा बंडलवर पुढे आणि मागे दोन खऱ्या नोटा लावून बाकी खोट्या नोटा देऊन ४९ हजारांची फसवणूक केली.
याबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहीती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना समजताच त्यांनी गणपती विसर्जन बंदोबस्तास असणारे स्थानिक गुन्हे शाखेतील.रविंद्र मांजरे, सहा.पेालीस निरीक्षक, दत्तात्रय जगताप सहा.पोलीस उप निरीक्षक, पो.हवा.शंकर जम, पो.हवा.शरद बांबळे, पो.हवा. रौफ इनामदार, पो.ना.चंद्रकांत जाधव, पो ना दीपक साबळे, चालक पो.हवा. काशीनाथ राजापुरे यांना गुन्हयातील आरोपी ताब्यात घेणेकामी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर स्थानिक गुन्हे शाखेची टीम व नारायणगाव पो.स्टे. कडील नेमणुकीचे पो.ना. बी. वाय. लोंढे व पो. काॅ. वाय. डी. गारगोटे असे गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरीता सपोनि श्री. गुंड, नारायणगाव पो.स्टे. यांचे सुचनेप्रमाणे रवाना झाले होते. नमुद पथकाने गुन्हयातील निष्पन्न आरोपींचा गोपनीय बातमीदारांकडून शोध घेऊन 1) प्रमोद भगवान साळवे, 2) बाबासाहेब बापू दाते, 1 व 2 रा. कासारी, ता. पारनेर, जि. अहमदनगर 3) समीर दशरथ वाघ, रा. गुर्वेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर, 4) अमोल बन्सी भोसले, रा. भोसलेवाडी-टेमदरा, ता. जुन्नर, जि. पुणे यांना पाठलाग करून शिताफीने गुन्हयातील मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकलसह पकडून नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहेे. पकडलेल्या आरोपींविरूध्द नारायणगाव, जुन्नर, खेड या पोलीस स्टेशनला खुन, दरोडा, चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत केल्यानंतर एलसीबीच्या पोलिसांनी समांतर तपास करून शिताफीने चारही आरोपींना अटक केली.आहे. अटक केलेल्या आरोपींविरूध्द नारायणगाव, जुन्नर, खेड पोलीस ठाण्यात खून, दरोडा, चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अमोल बन्सी भोसले याच्या विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून गुन्हा केल्यापासून तो फरार होता.