दुधनी दि २१ : -सध्या कोरोनामुळे जग लॉकडाऊनातून बाहेर पडत अनलॉक होता असतांना अजून काही कार्यालये “स्टे होम” ने घरातूनच काम चालू ठेवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूनये म्हणून शाळा बंद आहेत. तरी सरकार शिक्षण बंद राहू नये म्हणून मुलांना आनलाईन पद्धतीने शिक्षण मिळावे म्हणून काळजी घेत आहे. पालकांचे मोबाईलवरून विद्यार्थांच्या अभ्यास घ्या असे सरकार म्हणतो परंतु खेड्यापाड्यातील गोर गरीब मुलांना याची खूप समस्या येते. रोजीरोटीवर जगणारे पालक ‘अन्ड्राईड’ मोबाईल कसे घेऊ शकतात. बहुतेक गरीब मूल आज आनलाईन शिक्षणापासून दूरच आहेत.
याचा एक उदाहरण म्हणजे दुधनी येथील भिमनगर कन्नड शाळेतील विद्यार्थांचे बहुतांश पालकाकडे मोबाईलच नाहीत. काहीकडे आहेत तर ते अन्ड्राईड नाहीत. अशा परिस्थितीत तिथले शिक्षक आनलाईन शिक्षण अत्यंत प्रभावीपणे राबवत आहेत.
गेल्या वर्षी लोकसहभागातून शाळेला भेट घेतलेल्या ‘टॅब’ या प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत प्रभावीपणे उपयोगात आणले आहेत. त्या ‘टॅबना’ पालकांचा सहाय्याने ‘सिम’ घालून गेल्या तिन-चार महिन्यांपासून आनलाईन शिक्षण चालू ठेवले आहे. वाट्सप, झूममीट, गुगलमीट या अॅपद्वारे दररोज आनलाईन तासिका चालू आहेत. यासाठी काही मोजक्या पालकांकडे असलेल्या अन्ड्राईड मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीचा पण उपयोग घेतात. पालकांनी पण यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. शाळा बंद असूनही भिमनगर मध्ये शिक्षण सुरू आहे.
या विशेष उपक्रमाबाबत गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसूरे, विस्तार अधिकारी रतिलाल भुसे, केंद्र प्रमुख सुरेश शटगार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवकुमार लोड्डेनवरू आणि सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ कौतुक करत आहेत. या साठी मुख्याध्यापक गौतम कांबळे, शरणप्पा म्हेत्रे, शांतमल्लय्या स्वामी, सावित्री डोंगराजे, मल्लप्पा कांबळे, कलावती अरसगोंड, मलिकजान शॆख, विश्वनाथ रेऊर, विजयकुमार गायकवाड आणि निंगप्पा निंबाळ यांनी परिश्रम घेत आहेत.
अक्कलकोट प्रतिनिधी :- निंगप्पा श्रीमंत निंबाळ