पुणे दि १३ :-नव्या दमाच्या ८ ते १२ वयाचा खेळाडूवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करीत असून २०२८ आणि २०३२ ला होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये पुण्यातील खेळाडू असतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, आयुक्त, ओम प्रकाश बकोरिया यांनी आज व्यक्त केला.ऑलिंपिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दीचा कार्यक्रम आज दुपारी पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब येथे झाला. देशात ऑलिंपिक खेळांच्या प्रसाराची व या स्पर्धेतील सहभागाची पायाभरणी 100 वर्षांपूर्वी करण्यात उद्योग महर्षी सर दोराबजी टाटा आणि पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब यांचा मोठा वाटा होता.कार्यक्रमापूर्वी भारतीय ध्वज फडकाविण्यात आला. उद्योगमहर्षी सर दोराबजी टाटा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र हौशी अॅथलेटिक्स संघटना अध्यक्ष, अॅड.अभय छाजेड माजी आमदार दीप्ती चौधरी, डेक्कन जिमखाना क्लबचे पदाधिकारी विश्वास लोकरे, जिल्हा संघटनेचे वसंत गोखले, किशोर शिंदे, मधु देसाई, शशी लांडगे, स्विमिंग पंच नीता तळवलकर उपस्थित होते. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बकोरिया बोलत होते. ते म्हणाले, “येत्या काळात राज्य सरकार आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूनी नव्या दमाच्या
खेळाडूना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात श्री. बाळकृष्ण अकोटकर (टोकियो ऑलिम्पिक, १९६४ सहभाग), रेखा भिडे-मुंडपन (मॉस्को ऑलिम्पिक १९८० ), श्री. मनोज पिंगळे (सेऊल ऑलिम्पिक, १९८८) यांचा ओमप्रकाश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात आनंद मीनंजेस, (Anand Menezes ),आदिल सुपारीवाला ( मॉस्को ऑलिम्पिक-१९८०) यांनी झूम मीटिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.आनंद मीनंजेस, (Anand Menezes ),आदिल सुपारीवाला ( मॉस्को ऑलिम्पिक-१९८०) यांनी झूम मीटिंगद्वारे ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या नव्या दमाच्या खेळाडूना मार्गदर्शन करणार असल्याचे मान्य केले. कार्यक्रमात जिल्हा संघटनेचे वसंत गोखले लिखत पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सचिन आडेकर आणि उमेश जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजनास सहकार्य केले.देशात ऑलिंपिक खेळांच्या प्रसाराची व या स्पर्धेतील सहभागाची पायाभरणी 100 वर्षांपूर्वी करण्यात उद्योग महर्षी सर दोराबजी टाटा आणि पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब यांचा मोठा वाटा होता.भारतीय खेळाडू प्रथम १४ ऑगस्ट १९२० मध्ये बेल्जियम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पहिल्यांदा सहभागी झाले होते. त्यास १४ ऑगस्टला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. १४ ऑगस्ट १९१९ रोजी भारतीय भारतीय संघाच्या प्रवेशास अनुमती देण्याचे त्यावेळेचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉईड जॉर्ज यांनी डेक्कन जिमखाना क्लबचे अध्यक्ष उद्योगमहर्षी सर दोराबजी टाटा यांच्या मागणीनुसार मिळवून देण्याचे आश्वासन त्यानी दिले होते.
डेक्कन जिमखाना क्लब येथे झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आली होती. त्याला १४ ऑगस्ट २०२० ला १०० वर्ष पूर्ण होत आहे.