पुणे दि १२ :- पुणे परिसरात_श्री गणेशात्सवानिमित्त प्रतिवर्षी श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉल्सना बहुतांश फुटपाथवर जागा देण्यात येते . तथापि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी रस्ता अथवा पदपथांवर यावर्षी परवानगी देण्यात येणार नाही_यंदाचे वर्षी श्री गणेश मूर्ती विक्री व्यावसायिकांना पुणे महानगरपालिका क्रीडांगणांवर स्टॉलसाठी परवानगी दिली जाणार आहे . फक्त या वर्षासाठी पुणे महानगरपालिका क्रीडांगणांवरील श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी अनामत रक्कम रु . ५००० / – व प्रतिदिन भाडे रक्कम रु . ५०० / – आकारण्यात यावे तसेच पुणे महानगरपालिका शाळांच्या वर्गखोल्या देखील श्री गणेश मूर्ती विक्रेत्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करुन देणेत याव्यात अशा सूचना मा . महापौर यांनी पुणे मनपा प्रशासनास दिल्या आहेत ._