पुणे दि ०९ :-महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वन महोत्सव वृक्षारोपण उपक्रमांतर्गत १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी आपापल्या घरच्या आणि घराजवळच्या परिसरात वृक्षारोपण केले आणि त्याचे व्हिडीओ ऑनलाईन वेबिनार मध्ये सादर केले.अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना आणि स्टुडंट डेव्हलपमेंट एक्टिव्हीटी सेल ने आयोजन केले.डॉ. दिलनवाज पठाण ,प्रा .रजत सय्यद,डॉ.राणी पोटवळे ,डॉ .एजाझ शेख ,स्वप्नील दौंडे ,विद्यार्थी ,प्राध्यापक सहभागी झाले.हा उपक्रम ७ जुलै रोजी पार पडला .