पुणे दि ०८ :- पुणे जिल्हातील तलाठी कार्यालय सोरतापवाडी ता .हवेली जिल्हा पुणे जमिनीचे हक्कसोडपत्र आणि वाटप पत्राची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण तुळशीराम कारंडे वय ३५ तलाठी- सोरतापवाडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण सोरतापवाडी ता. हवेली येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या जमिनीचे हक्कसोडपत्र आणि वाटप पत्र करण्यासाठी रामकृष्ण यांनी ४० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीत २० हजार रुपये स्वीकारल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आहे . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर सपंर्क साधण्याबाबतचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १ . हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २ . ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३ . व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४ . व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००