पुणे दि ०६ :- पुणे कोथरुड परिसरात आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यातर्फे कोथरुड मधील किष्किंधानगर मध्ये आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यासोबतच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित परिसरातील नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. कोव्हिड-१९ चा वाढता प्रादुर्भावा लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदाद पाटील यांच्यातर्फे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.आज त्यातील सातव्या शिबिरात किष्किंधानगरमधील ११५० जणांची आरोग्य तपासणी करुन; सर्वांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणा-या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेविका छाया मारणे, मनिषा बुटाला, नगरसेवक दिलीप उंबरकर, संतोष अमराळे, भाजपचे पुनीत जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. गौरव पाटील, डॉ. प्रशांत बोरुडे, डॉ. तुषार जगताप यांचे विशेष सहकार्य मिळाले.दरम्यान, श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने विविध कोव्हिड १९ प्रतिबंधित क्षेत्र प्रवेशाच्या रस्त्यावर हाताने स्पर्श न करता साबणाने हात धुण्यासाठी हॅन्ड वॉश सिस्टीम बसवण्यात येणार आहे. आज जयभवानीनगरमधील कोव्हिड प्रतिबंधित क्षेत्राच्या प्रवेशद्वारावर ती बसवण्यात आली.