पुणे दि ०२ :- चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिहार चौक, औंध, बाणेर परिसरात मागील महिन्याभरापासून चोरट्यांनी दुकाने फोडण्याचे सत्र कायम ठेवत धुमाकूळ माजविला आहे.तर चोरट्यांनी पाषाण परिसरातील चार दुकाने फोडून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. महिन्याभरात चतुःश्रृंगी हद्दीत १७ दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे तर चोरट्यांनी उत्तम सुपर मार्केट, हरिओम सुपर मार्केट आणि बालाजी सुपर मार्केट दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. दुकाने फोडून चोरीच्या घटनांमुळे चतुःशृंगी परिसरातील किरकोळ व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपुर्वी चोरट्यांनी परिहार चौकातील एकाच इमारतीतील ९ दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले होते. त्यानंतर आठवड्याभरानंतर चोरट्यांनी पुन्हा औंधमधील तीन दुकाने फोडली. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून बाणेर पाषाण परिसरातील चार दुकाने फोडली आहे. त्यामुळे पोलिसांना चोरटे का सापडत नाहीत, असा सवाल स्थानिकांनी केला आहे. तर पाषाण परिसरातील या प्रकरणी अनिल आगरवाल (वय ५१, रा. बाणेर ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी पाषाण घडली. व ठिकाण दि .३०/ ०६ रोजी सायं १८:०० वा ते दि .०१/७ रोजी ०५:३० वाजण्याचे सुमारास आगरवाल सुपर मार्केट , नावाचे १/२७ आकाश कॉम्प्लेक्स शॉप नं .०६ , पाषाण पुणे व हरिओम सुपर मार्केट , बालाजी सुपर मार्केट पाषाण पुणे यातील फिर्यादी यांचे वर नमुद ता वेळी व ठिकाणी आगरवाल सुपर मार्केट किराणा माल विक्रीचे दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी दुकानाचे लोखंडी शटर लॉक लावुन बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे दुकानाचे शटर कशाचे तरी साह्याने उचकटुन वाकुन आत प्रवेश करुन दुकानातील काऊंटरच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली १५ हजार रूपये रोख रक्कम चोरुन नेली आहे . फिर्यादी यांची आणखी काही रक्कम चोरी गेली आहे का असे त्यांना वाटते त्याबाबत ते अधिक खात्री करुन त्याबाबत समक्ष येवुन कळवतील असे त्यांनी सांगितले तसेच फिर्यादी यांचे प्रमाणे इसम नामे दिनेश चौधरी वय ३६ वर्षे रा . पाषाण लिंक रोड , पुणे यांचे उत्तम सुपर स्टोअर्स तसेच प्रकाश गोस्वामी वय ३६ वर्षे रा.पाषाण लिंक रोड पुणे यांचे हरिओम सुपर मार्केट नावाचे दुकान तसेच पाषाण येथील बालाजी सुपर मार्केट दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे व पुढील तपास पो.उप.निरी . राकेश सरडे करीत आहे