टेंभुर्णी दि ०१ :- प्रतिनिधी, माढातालुक्यातील
घोटी येथे जीवन आधार फौंडेशन मिटकलवाडी व यम.आर.डी.एस. विकास मंडळ बार्शी यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप आज सकाळी घोटी गावामध्ये करण्यात आले .
हा कार्यक्रम जीवन आधार फौंडेशन मिटकलवाडी व यम.आर.डी.एस विकास मंडळ बार्शी यांच्या वतीने आज सकाळी घेण्यात आला
घोटी येथे 751 कुटुंबाना अर्सेनिक अल्बम 30 या कोरोना प्रतिबंधक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम ला अश्विनी हॉस्पिटल चे डॉ.मामासाहेब पाडुळे यांचे सहकार्य लाभले.
घोटी येथे उपस्थित सतिश दादा चव्हाण,प्रस्तावना रघुनाथ गवारे गुरुजी,पोलीस पाटील भागवत भोसले,टंटा मुक्ती अध्यक्ष दत्ता गळगुंडे,उपसरपंच बिटू अन्ना गळगुंडे,ग्रा.सदस्य बालाजी गायकवाड,बापूराजे सालूँखे,दादा कोळी,आरोग्य कर्मचारी सरवदे,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी,राहुल लोखंडे, अतुल खंडागळे,बंडू काळभोर,नागा काळभोर,समाधान लोखंडे, आदि ग्रामस्थ.
आरोग्यसेविका यांनी घरोघरी जाऊन गोळ्या वाटप केले जीवन आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष किशोर बापू सलगर यांनी 7500 नागरिकांची सेवा केल्यामुळे रघुनाथ गवारे गुरुजी यांनी किशोर बापू सलगर यांची स्तुती केली.
या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी व आरोयसेविका यांना मास्क, सानिटीझर, हॅन्ड ग्लोव्हस व रजिस्टर सतीश दादा चव्हाण यांनी स्व-खर्चातून वाटप केले.
या वेळी अश्विनी हॉस्पिटल चे डॉ. मामासाहेब पाडुळे यांनी गोळ्या घेण्या संदर्भात नागरिकांना समजावून सांगितले.तसेच डॉ. लोंढे यांनी ही नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले.
किशोर सलगर यांनी मिटकल वाडी, बेंबळे व घोटी या तीन गावा मध्ये 3200 कुटुंबाना व 21000 नागरिकां पर्यंत गोळ्यांचे वाटप केले. परीते, अकोले, शेवरे, माळेगाव या गावामध्ये 29000 हजार नागरिकांना गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50000हजार नागरिकांना पर्यंत गोळ्यांचे वाटप होत आहे. हा उपक्रम असाच ग्रामस्थानच्या मागणी नुसार चालू ठेवणार आहे असे जीवन आधार फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष किशोर बापू सलगर यांनी सांगितले