वर्धा दि ०१:- वर्धा जिल्ह्यात शिवसेनेने ईगल एक्सलटं कंपनीच्या बोगस बियाण्यांची जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारा समोर होळी करत जिल्हा प्रशासन, कृषी विभागाचा निषेध नोंदविला. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केल्या नंतर ही ईगल एक्सलनंटं इतर कंपन्यांचे बियाणे उगवलेच नाही . अनेक शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले . शेतकऱ्यांनि तक्रारी केल्यानंतरही कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून कृषी केंद्र चालक आणि संबंधित कपण्याविरुद्ध कार्यवाही करण्यात आली नाही . शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारा समोर ईगल एक्सलटं कंपनीच्या बोगस बियाण्यांची होळी केली .शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देत कंपन्यांवर कार्यवाही करण्याची मागणी शिवसैनिकानी केली .आंदोलनात जिल्हा प्रमुख अनिल देवतारे , प्रशांत शागडकर, उपजिल्हा प्रमुख तुषार देवडे, मनोज आत्राम, अशांक कावळे, अनेक शेतकरी व शिवसैनिक आंदोलनात उपस्थित होते
वर्धा प्रतिनिधी :- अमोल भास्करराव कोल्हे