पुणे, दि.१५:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती सहायक संग्राम इंगळे आदी उपस्थित होते.
नोव्हेंबर महिन्यातील ‘दीपोत्सव महाराष्ट्राच्या प्रगतीचा’ हा विशेषांक अतिशय दर्जेदार, वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे. या अंकामध्ये विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा विस्तृतपणे मांडण्यात आला आहे.
गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी केली. महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घातला आहे. विविध क्षेत्रात असलेल्या पहिला क्रमांक कायम ठेवण्यात यश मिळाले. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा यांमध्ये महाराष्ट्राने केलेली प्रगती लक्षणीय ठरली आहे. ‘सर्वांचीसाथ आणि सर्वांचा विकास’ या तत्वाचा अंगीकारकरत राज्याच्या विकासाच्या दिशेने चौफेर घोडदौड होत आहे.
गेल्या चार वर्षात विविध क्षेत्रामध्ये जो विकास झाला, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री, राज्यमंत्री यांनी नोव्हेंबरच्या विशेषांकात लेखाजोखा मांडला आहे. या अंकाची किंमत फक्त 10 रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय, पुणे येथे तसेच प्रमुख स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.