पुणे दि २९ : – चुतुश्रृंगी पोलिसांनी बाणेर परिसरात एका ऑन लाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यातील प्रमुख आरोपी एका बॅंकेत सहायक बॅंक व्यवस्थापक तर दुसरा संगणक अभियंता म्हणून काम करत आहे. त्यांनी स्विट सर्व्हिसेस एस्कॉर्ट नावाने वेबसाईट उघडली होती. पोलिसांनी रो हाऊस मालकासह चौघांना अटक केली आहे.दि २३ रोजी चतुःशृंगी पोलीस स्टेशन हद्दितील रो हाऊस नं १ , अर्बन क्रेस्टचे बाजुला , पाषाण टेकडीलगत , धनकुडे वस्ती , बाणेर पुणे या ठिकाणी ओयो
हॉटेल येथे अवैद्य वेश्या व्यवसाय चालक व मालक यांवर पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली होती.सदर प्रकरणाचा पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख परिमंडळ ४ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना सदरचे हाई प्रोफाईल सेक्स रॅकेट हे ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून चालवण्यात येत असून त्यामध्ये इतर हाय प्रोफाईल लोकांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे , पोलीस उप निरीक्षक मोहन जाधव व तपासपथक यांनी बाणेर बालेवाडी व मुंबई या ठिकाणाहून आरोपी नामे रविकांत बालेश्वर पासवान वय ३४ वर्षे रा . फलॅटनं . ३०५ एस -३ प्राईम सोसायटी सुसगाव पुणे मुळगाव – पासवान हौऊस , भोलेनाथ मंदिराचे समोर , ब्लॉक मुसाहरी ता . रमना जि , मुजभ्भपुर बिहारराज्य व दिपक जयप्रकाश शर्मा वय ३६ वर्षे रा . फ्लॅट नं .२ अंबर अपार्टमेंट , साई चौक , बालेवाडी पुणे मुळगाव प्रकाश भवन , बगाली पारा , इनकम टॅक्स , ऑफिस जवळ , जारसुगुडा ओरिसा यांना ताब्यात घेवून तपास केला असता सदरचे सेक्स रॅकेट हे बिट सर्व्हिसेस एस्कॉर्ट या वेबसाईट व्दारे चालविले जात असून एस्कॉर्ट सर्व्हिसेस बुकींग करिता वापरण्यात आलेले ११ मोबाईल फोन , ०४ लॅपटॉप व ०१ अॅपल आयपॅड तसेच वेश्या व्यवसाय वाहतुक करता वापरण्यात आलेली टाटा सफारी कार गुन्हयात जप्त करण्यात आली आहे . सदरचे गुन्हयातील मुख्य आरोपी नामे रविकांत पासवान हा बँकेत मुरुम जि.पुणे येथे असिस्टंट बँके मॅनेजर या पदावर असून दुसरा आरोपी दिपक जयप्रकाश शर्मा हा उच्चशिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअर आहे.सदरचा गुन्हयाची व्याप्ती मोठी असून सदरचा सर्व प्रकार हा ओयो हॉटेल रो हाऊस नं १ , अर्बन क्रेस्टचे बाजुला , पाषाण टेकडीलगत , धनकुडे वस्ती , बाणेर पुणे येथे सुरू होता. आरोपी नामे १ ) मॅनेजर सुरेश प्रल्हाद रणविर वय २५ वर्षे रा . रा . सध्या . ओयो होम , ४ ९९ ५३ , ऑडी शोरुमचे विरुध्द बाजुस , मॉडर्न हॉस्टेलजवळ बाणेर पुणे , मुळगाव – मु.उमरी , भाटेगाव , ता.हातगाव , जि . नांदेड २ ) रो नाकसेन रामदास गजघाटे , वय ५२ वर्षे रा.ए -११ , शगुन निसर्ग , बावधान पुणे .३ ) रविकांत बालेश्वर पासवान वय ३४ वर्षे रा . फ्लॅटनं . ३०५ एस -३ प्राईम सोसायटी सुसगाव पुणे मुळगाव – पासवान हौऊस , भोलेनाथ मंदिराचे समोर , ब्लॉक मुसाहरी ता . रमना जि . मुजम्मपुर बिहारराज्य ४ ) दिपक जयप्रकाश शर्मा वय ३६ वर्षे रा . फ्लॅट नं .२ अंबर अपार्टमेंट , साई चौक , बालेवाडी पुणे मुळगाव प्रकाश भवन , बगाली पारा , इनकम टॅक्स , ऑफिस जवळ , जारसुगुडा ओरिसा यांना अटक करण्यात आली आहे.तसेच महिला नामे शिवानी पाटील ऊर्फ जोया रेहान खान रा.भोपाळ -मध्यप्रदेश ही फरार असून तिचा शोध सुरु आहे . सदरची कारवाई ही सुनिल फुलारी , अपर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर व पंकज देशमुख , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ४ पुणे शहर , सहायक पोलीस आयुक्त , लक्ष्मण बोराटे , खडकी विभाग , पुणे शहर , यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.दाखल गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे हे करीत आहेत