टेंभूर्णी दि १९ :- (प्रतिनिधी)-माझे आंगण हेच शेतकर्यांच्या प्रश्नांचे रणांगण या अनोख्या पद्धतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर रयत क्रांती संघटनेने एक अनोखे आंदोलन केले असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सदस्स प्रा सुहास पाटील यांनी सांगीतले.सोलापूर जिल्ह्यातील रयत क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी आपल्या कुटूंबासमवेत शेतकर्यांचे विविध प्रश्नांचे बॅनर हातात घेऊन मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला.या मांगण्यामध्ये शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा.ऊस ऊत्पादक शेतकर्यांना एफ आर पी ची रक्कम त्वरीत देण्यात यावी.विजपंपाचे विज बिल माफ करण्यात यावे.शेती मालाला आधारभूत किंमत देऊन शासनाने मालाची खरेदी करावी.कांदा पिकाला क्विंटलला ५०० रूपये अनुदान देण्यात यावे.दुध ऊत्पादक शेतकर्यांना दूधाला प्रति लिटर ५ रूपये अनुदान द्यावे.सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्य्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करून परत देण्यात यावी.पुढील वर्षीच्या सन २०२०-२१ च्या शालेय व महाविद्यालयीन प्रवेश फी मध्ये सवलत देण्यात यावी.अशा विविध मागण्या मांडून सरकारचे लक्ष वेधुन घेण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.कोरोनो विषाणूच्या प्रार्दुभावामुळे संपूर्ण लाॅकडाऊन असल्याने शेतकर्यांच्या पिकांचे प्रंचड प्रमाणात नुकसान होत आहे.यावर सरकारने लवकरात लवकर ऊपाय योजना कराव्यात असे आवाहन प्रा सुहास पाटील यांनी केले.या अनोख्या आंदोलनात विश्वजीत पाटील,यशराज पाटील,विश्वतेज पाटील,मधुरा पाटील व आई मंगल पाटील हे कुटूंबातील सदस्स सहभागी झाले होते.
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप