निरा नरसिंहपुर दिनांक 12 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,नीरा नरसिंहपुर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नीरा नरसिंहपर परिसरातील गिरवी टणू पिंपरी आडोबा वस्ती ओझरे सराटी गोंदी लुमेवाडी गणेश वाडी शिंदे वस्ती या सर्वच भागामध्ये मेघराजाने विजांच्या कडकडाट व गारांसह दमदर हजेरी लावली. अवकाळी पावसा मुळे जपासलेल्या पिकांना गारांनी झोडपल्यामुळे पिके सर्वच भुईसपाट झाली तर
शेतकऱ्यांची चिंता वाढली एकीकडे भारत देशामध्ये कोरोनाव्हायरस च्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे अनेक हाल झाले शेतामध्ये पिकवलेल्या मालाची नासाडी झाल्यामुळे कवडीमोलाने याची किंमत बाजारात घ्यावी लागली. महाराष्ट्र शासनाणे कोरोना मुळे ठेवलेल्या या नियमाचे योग्यरीत्या पालन करून कोणत्याही परिस्थितीत शेतकरी प्रत्येक गावोगावी जाऊन स्वताचा माल विकण्यास पोटासाठी सुरुवात करून आपला
उदरनिर्वाह करू लागला आहे. कोरोना मुळे दुकानदारांकडून किराणा मालाचे दर गगनाला भिडले आहेत तर दुसरीकडे शेतकर्याने पिकवलेल्या मालाची बाजारात कवडीमोलाने किंमत द्यावी लागत आहे हा फरक आहे तरी का. असा विचार या परिसरातील सर्व शेतकरी कष्टकरी मजूर करीत आहेत.शेतकरी राजांचा शासनदरबारी विचार होऊन शेतकऱ्याला न्याय मिळणे गरज असून व पिकवलेल्या मालाला हमी भाव मिळणे गरजेचे व अशी या परिसरातील कष्टकरी शेतकऱ्यांची मागणी आहे.
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार,