पुणे ग्रामीण :-दि ८, जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड झाल्याची खळबळजनक पुणेे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील औंढे येथे जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड झाल्याची खळबळजन घटना दि,८ रोजी घडली. आहे दोघांची धारदार शस्त्राने हे दुहेरी हत्याकांड झाल्याने परिसरास संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
नावसू कुणाजी वाघमारे (वय ५५वर्षे) आणि लिलाबाई सुदाम मुकणे (वय ४८ वर्षे) अशी हत्या झालेल्या दोघांची नाव आहेत. हे दोघे जादूटोणा करत असल्याचा संशय काहीजणांना होता.त्यावरुनच त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज खेड पोलिसांनी वर्तवला आहे.
या हत्याकांड प्रकरणी कोहिंडे या शेजारील गावातील काही जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्यांची पोलिस सखोल चौकशी करत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलिस करत आहेत.