पुणे :दि ३१, खडकी येथील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या निरीक्षकाला अँन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) खडकी येथील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात करण्यात आली. पुणे अँन्टी करप्शनच्या पथकाने केलेली ही आजच्या दिवसभरातील दुसरी घटना आहे. दुपारी दौड येथील वनपाल याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.
संतोष धोंडु चौधरी (वय-४८ रा. खडकी) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीने पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभगाकडे तक्रार केली होती.
तक्रारदार यांनी खादी ग्रोमोद्योग मंडळाकडे कर्जासाठी अर्ज केला आहे. कर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्र तक्रारदाराने मंडळाकडे दिली आहे. कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदाराने निरीक्षक चौधरी यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली. हे प्रमाणपत्र देण्यासाठी चौधरी याने पाच हजार रुपयांची लाच मागितील. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खडकी येथील खादी ग्रामोद्योग कार्यालयात सापळा रचला. चौधरी यांना तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध पुणे विभागाचे पोलिस निरीक्षक अर्चना बोदडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.