पुणे, दि.१४ : -हडपसर पोलीस स्टेशन परिसरात देशी बनावटीचे पिस्टल बाळगुन गुन्हे करण्याच्या मार्गावर असलेल्या सराईतास जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. सदर गुन्हेगाराला काळेपडळ येथून अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रपतींच्या पुणे दौर्याच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशन च्या हददीत गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडून नये या अनुषंगाने मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे सोा यांचे मार्गदर्शनानुसार हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत सहा . पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व तपास पथकातील स्टाफसह पेट्रोलिंग करीत गोंधळेनगर येथे आले असताना सहा . पोलीस निरीक्षक चव्हाण , पो . शि . नितीन मुंढे व पो . शि . अकबर शेख याना गोपनीय बातमी मिळाली की , शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हेगारांची झाडाझडती घेत असताना आरोपी विनीत सुर्यकांत बिरादार उर्फ रेड्डी वय-१९, रा.भेकराई जकातनाका फुरसुंगी (मुळगाव : ठोणगाव ता.उदगीर जि.लातूर) हा देशी बनावटीचे पिस्टल बाळगत असल्याची माहिती हडपसर तपास पथकातील सहा.पो.नि. चव्हाण, पो.शि.नितीन मुंढे, अकबर शेख यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकातील कर्मचार्यांनी कालिका मंदिर, काळेपडळ येथून सदर आरोपीची अंगझडती घेतली meu ip असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण १०,६००/- रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्यास आर्म ऍक्ट खाली अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी रेड्डी याच्यावर यापूर्वी देखील हडपसर येथे शरिराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सपोनि चव्हाण करित आहेत. सदरची कामगिरी मा . सुनिल फुलारी , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . सुहास बावचे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , मा . कल्याणराव विधाते , सहा . पोलीस आयुक्त , यांचे मार्गदर्शनाखाली मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे , मा . पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) हमराज कुंभार यांचे सुचनानुसार सहा . पोलीस निरीक्षक संजय चव्हाण , पो . हवा . युसुफ पठाण , पो . हवा . सपंत औचरे , पो . हवा . राजेश नवले , पो . ना . प्रताप गायकवाड , पो . ना . विनोद शिवले , पो . ना . सैदोबा भोजराव , पो . ना . गणेश दळवी , पो . शि . नितीन मुंढे , पो . शि . अकबर शेख , पो . शि . शाहिद शेख , पो . शि . शंशिकांत नाळे , पो . शि . प्रशांत टोणपे यांनी केली आहे