माळकिन्ही दि३० :-माळकिन्ही येथे कर्जबाजारीपना व परतीचे पावसाने शेतीतील झालेल्या पीकाचे नुकसानीमुळे गजानन रामजी शिरडकर वय ४७ वर्ष याणे गळफास लावुण आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ११ वाजताचे दरम्यान घडल्याचे ऊघडकलीस आली. माळकिन्ही ता.महागांव येथील शेतकरी गजानन शिरडकर यांच्या कुटुंबात चार अेकर शेती आहे त्यांचेकडे बॅंकेचे कर्ज असुन मुलगी लग्नाला आली आहे.ह्या आठवड्यातील परतीचे पावसाने पिकाची झालेली नासाडी पाहुन खचला होता ह्या दोन दिवसात त्याची मनस्थीती बरोबर नव्हती मुलीचे लग्न व कर्ज कसे फेडावे ह्या विचनेत होता असे समजते त्याचेमागे अेक मुलगा, दोन मुली , व पत्नी असा परिवार आहे
संदीप तुपकरी नांदेड प्रतिनिधी