पुणे दि,२२ :- पुणे शहरामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापरास पूर्णतः निर्बंध आणण्यात आले असून,त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये प्लास्टिकचे आकशकंदील, नॉन ओव्हन बॅग, ५० मायक्रोन खालील प्लास्टिकचे पिशव्या, चमचे इत्यादींवर
कारवाई करणेत येत आहे. प्लास्टिकवर कारवाई करणेसाठी ठिकठिकाणी दुकानांची तपासणी करण्यात येत असून त्यांचेकडून प्लास्टिक जप्त करण्यात येत असून दंडात्मक कारवाई देखील करणेत येत आहे. त्याचप्रमाणे जे नागरिक वरीलप्रमाणे प्लास्टिक वापर करताना आढळून येत
आहेत त्यांना देखील ठिकठिकाणी रस्त्यांवर व कचरा गोळा केल्यानंतर त्यामध्ये सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास संबंधित नागरिकांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी असल्याने शहरामध्ये कारवाईची तीव्रता वाढविण्यात आलेली आहे.
एकूण २७७१ दुकानदार व नागरिक यांना २४,९४,९६०/- इतका दंड पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे.