पिंपरी,दि.३१ :- महाराष्ट्रात मराठी माणसाच्या होणाऱ्या कुचंबनेतून जन्माला आलेला शिवसेना हा आज एकमेव पक्ष कार्यरत आहे. या समाजभिमुख पक्षाचे सभासद होण्यासाठी शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवार (दि. ३०) रोजी “बुलंद महाराष्ट्र – बुलंद शिवसेना” या सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला.
शिवसेनेच्या या “बुलंद महाराष्ट्र – बुलंद शिवसेना” नोंदणी अभियान यात्रेचा शुभारंभ शिवसेना नेते रविंद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार गौतम चाबूकस्वार, शिवसेना कामगार नेते तथा भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद यांच्या उपस्थितीत काल दुपारी २.३० वाजता आकुर्डीतील शिवसेना भवन येथे संपन्न झाला.
यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हा प्रमुख माउली आबा कटके, गजानन चिंचवडे, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, शहर संघटिका उर्मिलाताई काळभोर, सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसेना सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना उपनेते शिवाजिदादा आढाळराव म्हणाले की, शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून व सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे शिवसेनेची भूमिका, विचार व केलेली विकासकामे ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले पाहिजे. मी मोठा की तू मोठा यात न गुरफटता शिवसेनेला मोठे करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने योगदान दिले तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त आमदार शिवसेनेचे असतील” असा विशास व्यक्त केला.
शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद यांनी पिंपरी चिंचवड शहरात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कार्यशैली आवडणारा युवा व मध्यम वर्ग प्रचंड प्रमाणात आहे. हा वर्ग सुरुवातीपासूनच शिवसेनेबरोबर आहे. शिवसेनेच्या कार्याचा पसारा पाहूनच अनेक नव सभासद शिवसेना पक्षात सहभागी होत आहेत. पिंपरी चिंचवड शहर व भोसरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त सभासद या “बुलंद महाराष्ट्र – बुलंद शिवसेना” या सभासद नोंदणी अभियानातून शिवसेनेशी जोडला जाईल. सभासद नोंदणी अभियानास आज मोठा प्रतिसाद मिळाला असून, आगामी काळात या यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने सभासद या नोंदणी मोहिमेत सामील होतील व भोसरी विधानसभेत शिवशाहीचा आमदार निवडून आणण्यासाठी पेटून उठतील, असा आशावाद व्यक्त केला