पुणे , दि.२४ :- पुण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दुर्गम आदिवासी भागातील दत्तक घेण्यात आलेल्या व्याहाळी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सदतीस विद्यार्थ्यांना छत्र्या व रेनकोटचे वाटप करण्यात आले.दत्तकग्राम मधील या विद्यार्थ्यांना वीर सावरकर रक्तदाता संघाचे अध्यक्ष संतोष पिंगळे तसेच कार्यक्रमाचे आयोजक संदीप सावे ह्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. टी-शर्ट व रंगीबेरंगी छत्र्या हाती पडताच मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.यावेळी वनवासी विकास प्रकल्पाचे महेश वझे, हरिश्चंद्र कापसे, दत्तात्रय शिंदे, शैलेश पाटील, विवेक धोडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सामाजिक बंदिलकीची जाण असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे संदीप सावे यांनी सांगितले. या उपक्रमाचे समाजातील सर्व लोकांनी स्वागत केले.