मुंबई :कुशल कौशल्य विकास म्हणजे काय……..? देशाच्या सामाजिक, सांस्कृतीक कलेच्या माध्यमातून उपजीविकेच्या रचनेतील पिढ्यानपिढ्या कुशल कर्म करत राहणारयांच्या हाताना,अवयवाना कलेतील साचेबद्ध कामाच्या सवईतून सततच्या कर्माने कुशल कौशल्यातुन पैलूंना चालना मिळवतो. सुक्ष्म अवजाराच्या तंत्रापासून साकार होणारे कर्म नसानसात भिड़ते आणि त्याची स्मूर्ती मेंदुच्या एका कप्प्यात विकसित होते तेथून विश्वकर्मियांना पारंपारीक सांस्कृतीच्या कर्मातून कलेच्या आविष्कार प्राप्त होतो. तो असाच नाही प्राप्त होत, त्यासाठी परंपरागत पिढ्यानपिढ्या कर्माच्या योगदानातून जी कला हस्तगत होते, तो त्या कुशल कौशल्याचा कर्मकर्ता,कारागीर होतो.त्याकर्मातून मिळालेल्या मोबदल्यात उदरनिर्वाह करतो त्याला विश्वकर्मीय,बलुतेदार,अलुतेदार कारागिर वर्ग म्हणून संबोधले गेले.त्याचेच रूपांतर पारंपारिक,वैचारिक बांधणीत ह्या वर्गाना कौशल्य निहाय कर्मानुसार जातींचे स्वरुप निर्माण झाले.ते उदरनिर्वाहाच्या कर्मकांडात सातत्याने आपापल्या कर्मात कुशलतेत प्रावीण्य प्राप्त करत असलेल्या उद्योगाचेक दावेदार झालेत. उद्योगाच्या स्वरूपातुन सामजिक व्यवस्तेत जातिय वर्गीकरण झालीत.त्या आताच्या नव्हे तर हजारो वर्षापुर्वी युग-युगांतरापासून कर्म करत असलेले कुशल-कौशल्य जाती आहेत त्यांना पुरावा देण्याची अवश्यकता नाही.शासने त्यांना वरील सांस्कृतिक आधारावर सरळ त्याच्या क्षेत्राशी संलग्न कारागीर जातींना निरीक्षनामार्फहात मुलाखतीतून कुशल कारागीर म्हणून कौशल्य विकासांतर्गत प्रमाणपत्र देऊन नोकर भरतीत विना निकस नोकरी द्यावी व उधोगासाठी एम आय डी सित उधोगनिहाय माफक दरात भूखंड देऊन बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. शाहूमहाराजानी बाराबलुतेदारांना राज्यभर प्रत्येक गावात उधोगासाठी व राहण्यासाठी जागा दिल्या होत्या त्यांना आज सुतार वाडा,राज वाडा,चामभार वाडा,मांग वाडा,लोहार वाडा,शिंपी वाडा,गुरव वाडा,कुंभार वाडा,धोबी वाडा,सोनार वाडा,कासार,तांबट व गल्ली,असे राज्यभर नावारूपाला आहेत परनु आज व्यवसायाला जागा नसल्याने शासनाने भूकंड द्यावेत तेथूनच बारा-बलुतेदार विकास साधू शकतील*
*जागतिक स्तरावर प्रत्येक देश्यात आर्किटेक्चर, इंजिनिअर, इन्फ्रास्ट्रक्चरपासून पुरातन वास्तु, राजवाडे, शस्रे,वाहने,मंदिरे, व गाव व्यवतेतिल मानवी उपजीवीकेची सर्वच कुशल कलात्मक कौशल्यपूर्ण कर्म करणारा वर्ग म्हणजेच विश्वकर्मीय जाती सुतार,लोहार,पाथरवट,तांबट,सोनार होय. चांभार,शिंपी,नाव्ही,*धोबी,कुंभार,कोष्टी,महार,मांग,गुरव,वासुदेव/दोशी ह्या सर्व बाराबलुतेदार जाती होय,आज देश्याबरोबर प्रगत देशही कुशल कौशल्य तंत्रज्ञानाचा अभ्यास पूर्वक शिक्षणात समावेश करून* *सिव्हिल,मॅकॅनिकल,इलेक्ट्रिकल,आटो,मेटलकासस्टिंग,प्रॉडकशन,मशनरी,ड्रेस मेकिंग,लॉन्द्री इंडस्ट्री,लेदर इंडस्ट्री,रोफ/स्वीपर मटेरियल प्लास्टिक*इंडस्ट्री,फर्निचर,हार्डवेअर इंडस्ट्री,स्टील बिल्डिंग इरेकशनसारखे कोर्स आय टी, इंजिनिअरिंग,डॉक्टर क्षेत्रातील सर्वच शिक्षण कौशल्याचे जनक बाराबलुतेदार वर्गच आहेत.त्यांच्या कौशल्यातून विकास साधताना सामाजिक अवस्थेतुन ह्या कौशल्याच्या जनकास विशेष सवलतीतून वरील क्षेत्रारात स्किल इंडिया अंतर्गत वाव मिळाल्यास देश्याचा प्रगतीस जागतिक स्पर्धेत मेक इन इंडियाला चालना मिळू शकेल*
*गाव निहाय तर परिसर निहाय फिरुन गरजेच्या वास्तु तयार करून पुरवणारा आठरा-पगड जातींचे अलुतेदार मुळात हे वर्ग कुशल आहेत,यांच्या बरोबर देशाच्या विकासात विश्वकर्मीय,बलुतेदार शेती, कारखाने, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या क्षेत्रात हाच वर्ग कार्यरत होता आजही आहेत, कारण तो कुशल आहे. आपल्या कर्मात गुरफटलेला असल्यामुळे ते शिक्षण स्पर्धेत तग धरु शकले नाहीत.पर्यायी आर्थिक सक्षम होउ शकले नाहीत. उधोग, मायक्रो इंडस्ट्री पासून मोठया इंडस्ट्री पर्यंत हा कारागीर वर्ग कार्यरत असल्याने ते देश्याच्या विकासात कणा बनले आहेत.ह्या वर्गान्ना कोणी वाली नव्हते,प्रतिनिधी नव्हते. परन्तु जाणताराजा शिवरायांनी बारा-बलुतेदार व अठरा अलुतेदाराना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. कारण ग्रामीण भागातील गावांमध्ये शेतकऱयांना गावगाडा चालवण्यासाठी ह्या वर्गाशिवाय राज्यांची प्रगती नाही. लहान उद्योजकांमुळेच मोठे उद्योजक प्रगती करु शकतात.हे जाणून त्याकाळी शिवाजी महाराजांनी ह्या वर्गाचा उद्धार केला, परन्तु त्यांचे दुर्दैव्य हे कष्टकरी वर्ग असल्याने त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आधोगिक व आर्थिक प्रगतिसाठी त्या काळात दुर्लक्षित राहिलेत*
*देशअंतर्गत स्वातंत्र्यानंतर समाजरत्न बाबासाहेब आम्बेडकरानी शाहू महाराज, क्रांतिसूर्य जोतिबा फूले, सावित्रीबाई फुलेना गुरुस्थानी मानत होते. वंचित बहुजनांना समानतेच्या नाऱ्यातून कायदामंत्री असताना भारताच्या लोकशाही घटनेत इतर मागास जातींच्या गटात सामिल करून ३४० व्या कलमान्वये आरक्षण दिले.सरदार वल्लभ भाई पटेलांनी व सवर्णानी आरक्षणाला विरोध केला तेंव्हा बाबासाहेबानी मंत्रिपदाचा राजीनामा पटेलांना दिला तेंव्हा नाममात्र आरक्षण देण्याचे षड़यंत्र योजले.पुढे स्व.इंदिरा गांघी, स्व.व्ही.पी.सिंह,यांही आरक्षणाला मजबूती देण्याचे काम केले.तेथून दिलासा मिळत शिक्षण,नोकारित फायदा मिळाला.परंतू स्पर्धेच्या यांत्रिक युगात धनाड्यानी यांचे उधोग बळकावून बलुतेदातीतील मूळ कुशल कारागिराना काम शिल्लक ठेवले नाही.त्यांचा शासनात आज पर्यंत प्रतिनिधी नसल्याने त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे त्यांना न्याय मिळणे देशहिताचेच राहील कारण तो कुशल कौशल्याधिस्ट आहे.*
*बलुतेदारांच्या अवस्ता फार गंभीर आहेत.त्यांहा मिळणारे खादीग्रामोद्योगचे कर्ज बंद करण्यात आलीत. मुद्रा लोन मॉर्गेज शिवाय मिळत नाही, पंतप्रधान योजनेतील कर्ज बँकेचे कर्मचारी नातेवाईकाना किंवा दहा टक्केवाले डल्ला मारतात.नोट बंदीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्वताचाच पैसा लाइनित उभे राहुनही मिळत नव्हता बँकखाती हॅक होत होते,सर्व क्षेत्रात मंदीची लाट आली उदारनिर्वाहसाठी काम मिळत नाही, हातात पैसा नाही, अघोषित आणीबाणी सदृष्य स्थिति निर्माण झाल्यासारखे वातावरण निर्माण झाल्याच्या वर्त्तमानपत्रातुन, टी.व्ही.च्या चर्चेतून बातम्या सुरु आहेत. देश मागे जात आहे. आणि शासनास देश्यात पन्नास कोटी कुशल-कौशल्यबळ हवे आहे.हे कसे शक्य आहे…? त्यासाठी जातिवंत तयार कुशलांचा संच म्हणजे बाराबलुतेदार व विश्वकर्मीय होय, तो आर्थिक सक्षम नाही शिक्षण स्पर्धेत टिकाव धरु शकला नाही, परन्तु कुशल कारागिर म्हणून तेच नावारूपाला आहेत त्यांना न्याय मिळावा. त्यांच्या कुशलतेने देश जागतिक स्पर्धेच्या प्रवासात नक्कीच अंतर गाठू शकतो.*
*देशातील विद्यार्थ्यांमध्ये कुशलता येण्यासाठी कौशल्य विकास, इंजिनियरिंग, टेक्नीकल क्षेत्रातुन प्रयत्न केले जात आहेत. परंतु कुशल कलेच्या नैसर्गिक कौश्यल्याचा आविष्कार ठरलेला विश्वकर्मीय वंशज, बालुतेदार व अठरा अलुतेदार ह्या जाती पारम्परिकतेच्या उद्योगाने कौशल्यपूर्ण आहेत. देश्यात कौशल्य विकासातून आलेले विद्यार्थी शिकुनही कला आत्मसात होत नाही, आणि दुसऱ्या माध्यमातून ते नोकरीत डल्ला मारतात खरा कुशल कारागिर बाजुलाच रहातो.*
*स्पर्धेच्या यंत्र युगात बलुतेदारांना स्किल इंडिया आधारित शासकीय योजनेत स्वतंत्र प्रशिक्षण व्यवसंस्थेतून नोकरीत सामिल करावे, व्यवसायाला खादी उद्योग अथवा कौशल्य विकासांतर्गत सारथी योजने प्रमाने स्वतंत्र बिन व्याजाची मराठा-कुणब्याना जाहीर योजने प्रमाणे व्यवस्था व्हावी, उद्योगासाठी भूखंड द्यावा, कुशल बलुतेदाराना पूरक मानसिकता कशी घडवता येईल यावर लक्ष केंद्रित करून त्यांना सॉफ्टस्किलच्या प्रशिक्षणातून व्यवसायाची संधि निर्माण करून द्यावी, त्यातून उधोग क्षेत्राची रचना कशी करावी, प्रोडक्ट डिज़ाइन, ग्राहक सेवा, नफा सूत्र या संदर्भात शासनाने बलुतेदारांना तालुका निहाय प्रशिक्षण द्यावे. केंद्र-शासनाने पूर्वी ह्या सुविधा खादी-ग्रामोद्योगातून दिल्या होत्या, परन्तु आज राज्यशासनाला बलुतेदारांच्या सुविधांचे गाम्भीर्य दिसून येत नाही, देश्यात व राज्यात कौशल्य विकासांतर्गत शासन स्थरावर जसा गाजावाजा होत आहे तशी चालना नाही, शासनाने सारथी योजनेप्रमाणे कुशल-बलुतेदार योजना ह्या नावाने स्किलइंडिया अंतर्गत न्याय द्यावा.त्यातून हा वर्ग सक्षम होऊन देशाला कुशल कारागीरांच्या समर्थनातून लहान मोठ्या उद्योगाना पूरक ठरतील, त्यातून मेक इन इंडियाच्या प्रवासालाही गती,बळकटी मिळेल आणि बलुतेदार ही सक्षम होतील.*
चंद्रकांत डी गवळी, 9372712221
राज्य सरचिटणीस
बारा बलुतेदार महासंग,महाराष्ट्र
बाळू राऊत प्रतिनिधी