आष्टी: दि. २२ :- बाळू राऊत प्रतिनिधी आपण नावलौकीक मिळवल्यास आपल्या आई वडिलांना सन्मान मिळतो,त्या दृष्टीने आपण पुढील स्पर्धेच्या युगात वाटचल करत असतांना ध्येय निच्छित केल्यास यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन आष्टीचे पोलीस उपविभागीय आधिकरी विजय लगारे यांनी केले ते आष्टी तालुका युवा पत्रकार संघ व गुरुदत्त सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, नायब तहसिलदार शारदा दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र ढोबळे,पोलिस मित्र जिल्हाध्यक्ष अनंत जोशी हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना लगारे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्याथ्यामध्ये गुणवत्ता आहे परंतु त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचा मार्ग चुकला जातो. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करुन अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. जिवनात आपल्याला काय करायचे ही जिध्द बाळल्यास ध्येय गाठता येते. आपल्या यशाने आपल्या आई वडिलांचा मान सन्मान वाढतो. असे केल्याने माणुस म्हणुन जगण्याची किंमत कळते.
यावेळी नायब तहसिलदार शारदा दळवी म्हणाल्या की, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. घरातील अनेक जबादा-या असतांनाही सर्व जबाबदा-या पार पाडुन मुली विशेष गुण मिळवुन उत्तीर्ण होतात ही बाब कौतुकास्पद आहे. आम्ही मुली कुठेच कमी नाहीत. दहावी आणि बारामध्ये जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झाले म्हणजे यशस्वी झाले असे नाही, तर महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर खरी तुमची परिक्षा सुरु होते. यामध्ये अनंत अडचणी येतात यश अपयश तुम्हाला तेंव्हा पहायला मिळेल त्यामुळे जिध्द ठेवुन अभ्यास करुन यशस्वी व्हा असे दळवी यांनी शेवटी सांगीतले.
यावेळी साक्षी थोरवे, सृष्टी जगताप, अशिलेषा दहिफळे, जय मुथ्था, वैष्णवी जमदाडे, समरीन शेख, भानुदास शिरगिरे, गौरव औंदकर, ऋतिका चव्हाण, वैष्णवी धोंडे,वृषाली श्रीखंडे, या गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार समारभं येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवुन गौरविण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव अविशांत कुमकर, निसार शेख, संतोष तागडे, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, तुकाराम भवर, किशोर निकाळजे,आण्णासाहेब साबळे, जावेद पठाण,यंशवत हबंर्डे,सजय खंडागळे,नितिन कांबळे, अशोक मुटकुळे, प्रकाश आजबे,अतुल जवणे, सावळाराम बळे,अमोल कदम, विठ्ठल खाडे,आंबादास कर्डीले,गणीभाई ताबोळी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.तर बहारदार सूत्रसंचालन राजेंद्र लाड यांनी केले आणि आभार अविनाश कदम यांनी मानले.