नवी दिल्ली,दि.२२:-अमेरिकेत विलमिंग्टन येथे 6 व्या क्वाड शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भेट घेतली. मे 2022 पासून हा त्यांचा व्यक्तिगत स्वरूपातला नववा संवाद होता.
दोन्ही नेत्यांनी राजकीय आणि धोरणात्मक, संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण आणि संशोधन, हवामान बदल आणि नवीकरणीय ऊर्जा आणि व्यक्ती ते व्यक्ती संबंध यासारख्या विस्तृत क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली. दोन्ही पंतप्रधानांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचार विनिमय केला. वारंवार होणाऱ्या उच्च-स्तरीय भेटीगाठींमुळे द्विपक्षीय संबंधांना मजबूत गतिशीलता प्राप्त झाल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय मंचावर सहकार्य सशक्त करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे नूतनीकरण केले आणि भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी अनोख्या उंचीवर नेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.