पुणे,दि.२१:- पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रोड परिसरात काल दि. २० रोजी एका डिजिटल कटेंट क्रिएटर महिलेला कारचालकाने मारहाण केली. या मारहाणीनंतर सदर महिलेने रक्तबंबाळ अवस्थेत स्वतःचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी काही तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.
२७ वर्षीय जेरीलन डिसिल्वा या त्यांच्या मुलांसह स्कुटीवरून बाणेर पाषाण लिंक रोड येथुन प्रवास करत होत्या. यावेळी एका चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करताना व डिसिल्वा ओव्हरटेक करण्यासाठी जागा देत नसल्याचा राग चारचाकी वाहनातील स्वप्निल केकरे नामक आरोपीचा राग आला. त्यामुळे ओव्हरटेक करून पुढे गेल्यानंतर आरोपी स्वतःच्या गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी जेरीलन डिसिल्वा यांना मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर जेरीलन यांनी त्याच अवस्थेत व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकला.
जेरीलन डिसिल्वा यांनी व्हिडीओमध्ये दावा केला की, आरोपीने त्यांचे केस ओढून तोंडावर आणि नाकावर दोनवेळा बुक्का मारला. ज्यामुळे नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. माझी लहान मुलं बरोबर असतानाही आरोपी यान मारहाण करून पळ काढला..
या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. चारचाकी वाहनातील आरोपी स्वप्नील केकरे याला पोलिसांनी अटक केली आहे व आरोपी स्वप्नील यांची पत्नी घटना घडली तेव्हा गाडीतच उपस्थित होती, त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. डीसीपी विजयकुमार मगरे यांनी या सांगितले, हा गुन्हा चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करत आहोत.