पुणे,दि.१६:- पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात पती ने पत्नीला लॉजवर नेऊन घटस्फोटाचे प्रकरण मिटवण्यासाठी व दोघांनी एकत्र येण्याचा विचार केला होता परंतु परत लॉजमध्ये वाद झाल्यामुळे रागाच्या भरात चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडली आहे.
पती पत्नीत घटस्फोटाचे प्रकरण व घरगुती वादातून पतीने चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केला, त्यानंतर पती लॉजला कुलूप लावून निघुन गेला. ही घटना शनिवारी (दि. १५) रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
काजल कृष्णा कदम (वय २७ वर्षे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार काजल आणि कृष्णा पती पत्नी होते, ते दोघेही मजूरी चे काम करत होते. शनिवारी दुपारी ते भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लॉजवर उतरले होते.
दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते, मात्र दोघांनीही पुन्हा एकत्रित येण्याचा विचार केला आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी लॉजवर आले होते. दरम्यान दोघांनी मद्यपान केले, आणि त्यांच्या मध्ये वाद झाला.
या नंतर पतीने चाकूच्या साह्याने पत्नीवर वार करून खून केला व तेथुन निघुन गेला.
काही वेळाने त्याने आपल्या मित्राला खून केल्याची माहिती दिली.
यांनतर मित्राने घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.
दरम्यान पोलिसांनी तात्काळ त्यानंतर पोलिसांनी तत्काळ लॉजवर धाव घेतली आणि मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी कृष्णा कदम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याने लॉजवर नेऊन काजलचा खून केल्याचे सांगितले. आरोपीने खून कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.