पुणे,दि.२३ -: पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग करणाऱ्या तिघांना चतुःश्रृंगी पोलीसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून १ लाख रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
भारत दिलीप दिनकर, वय २३ वर्षे, रा. इंदिरानगर, पाथर्डी, व त्याचे साथीदार सागर जगधने व गणेश दिनकर यांच्यासह पाथर्डी, जि. अहमदनगर
अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचींगच्या गुन्हयांवर आळा बसावा, याकरिता मोहिम राबवून कारवाई करणेबाबत.वरिष्ठांनी आदेश दिले पोलीसांना दिले होते त्याअनुषंगाने चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन कडील तपास पथक हे गु. र. क्र. ३३३/२०२४ भादवि कलम ३९२, ३४ या चेन स्नॅचींग गुन्हयाचा तपास करत असताना सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करून आरोपींनी गुन्हयामध्ये वापरलेली दुचाकी एका ठिकाणी लपवून ठेवल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी सापळा रचुन दुचाकी घेवून जाण्याकरिता आलेल्या आरोपीस सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेवून
अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल जप्त करण्यात केला. ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीतील गंठण जप्त करण्यात आले. या कारवाईत दुचाकी, एक मोबाईल, सोन्याचे गंठण असा एकूण १ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चेन स्नॅचींग करण्याकरिता पुणे येथे आल्याचे त्यांनी सांगितले असून पोलीस पकडतील या भितीने त्यांनी गुन्हयातील दुचाकी एका ठिकाणी लपवून ठेवून बसने पाथर्डी येथे गेल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परी-४, पुणे शहर विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त, आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक गुन्हे, युवराज नांद्रे, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक, रुपेश चाळके, प्रणिल चौगुले, तपास पथकातील पोलीस अंमलदार विशाल शिर्के, श्रीधर शिर्के, किशोर दुशिंग, प्रदीप खरात, श्रीकांत वाघवले, बाळासाहेब भांगले, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे, सुधीर माने, इरफान मोमीन, बाबा दांगडे व संदिप दुर्गे यांनी केली आहे.