पुणे,दि.१७:- पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहर आयुक्तालयात ३ हजार २८७ मतदान केंद्र असून त्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघातील ४३० मतदान केंद्र आहेत. १६ संवदेनशील मतदान केंद्र आहेत. याकरीता ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
आदर्श आचारसंहितेची अतिशय पारदर्शक, प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याकरीता पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. निवडणुकीवर प्रभाव पाडणाऱ्या बाबीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येत आहे. ‘सी-व्हिजील’ ॲप आणि ‘सुविधा’ संकेतस्थळावरील तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात असून, याकरीता पुणे शहर पोलीस दल सज्ज आहे, असेही पोलीस आयुक्त कुमार म्हणाले.