पुणे,दि.२८:- पुणे शहरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना सोनसाखळी चोरांकडून लक्ष्य केले जात आहे. सहकारनगर, दत्तवाडी, कोंढवा व बिबवेवाडी या ठिकाणी सोमवारी सकाळी तासाभरात तीन महिलांसह चारजणांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या.
चार तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी परिसरात शंकर महाराज मठाजवळ पदपथावरून महिला पायी जात होती. दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याबाबत लता राजू धोतले (वय ५१, रा. बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार
कचरा बाहेर टाकण्यासाठी आलेल्या महिलेचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना पर्वती गावात नंदादीप सोसायटीसमोर सोमवारी घडली. याप्रकरणी मनीषा संदीप शेलार (वय ३३, रा. पर्वतीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला सकाळी फिरायला गेलेल्या एका महिलेचे साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार आणि मणी मंगळसूत्र यांचा समावेश आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात स्टेट बॅंकेसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी सुलोचना अशोक हळंदे (वय ५०, साईनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचे साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार आणि मणी मंगळसूत्र यांचा समावेश आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात स्टेट बॅंकेसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी सुलोचना अशोक हळंदे (वय ५०, साईनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनसाखळी हिसकावून चोरट्यांची ‘धूम’ सकाळी फिरायला जाणाऱ्या परत घरी पायी जाणाऱ्या एका व्यक्तीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. फिर्यादी वीरेंद्र विश्वास केळकर (वय ५३, महेश सोसायटी, बिबवेवाडी) हे स्वामी विवेकानंद रोडने घरी जात होते. त्यावेळी दुचाकीरून आलेल्या चोरट्यांनी केळकर यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसका मारून नेली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.