पिंपरी चिंचवड,दि.१७ :- हिंजवडी पोलीस स्टेशन हददीत चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोड लगत अनधिकृत फ्लेक्सबाजी करणारा गुन्हागार निलेश गायवळ याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोडजवळ वाढदिवसाचे मोठे अनधिकृत फ्लेक्स लावले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने त्याचे फ्लेक्स हिंजवडी
निलेशभाऊ गायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर अनधिकृत फ्लेक्स लावले प्रकरणी निलेश काळुराम घोलप परवाना निरीक्षक कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय यांनी दिले फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात कलम १८८ व मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.याप्रकरणी निलेश कालुराम घोलप यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.